कास्टिंग काउचवर अभिनेत्रीचा मोठा खूलासा, पगार वाढवण्यावर प्रोड्युसरने ठेवली होती ‘ही’ अट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयुष्मान खुरानाच्या ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ मध्ये काम केल्यानंतर,अभिनेत्री मानवी गागरू लवकरच अ‍ॅमेझॉन प्राइमच्या वेब सीरिज ‘फोर मोर शॉट्स प्लीज’ च्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसली.यापूर्वी मानवी या मालिकेच्या पहिल्या सत्रातदेखील दिसली होती. ज्यामध्ये तिने आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकले. पण, यादरम्यान मानवीने इंडस्ट्रीमधील कास्टिंग काउचबद्दल मोठा खुलासा केला आहे.

अभिनेत्री मानवी गागरूने कास्टिंगकाउचवर आपला अनुभव सांगताना खुलासा केला आहे की सुमारे एक वर्षापूर्वी एका वेब सीरिजच्या निर्मात्याने कॉम्प्रोमाइजच्या बदल्यात तिला तीनपट फीज देऊ केली होती. मानवीच्या म्हणण्यानुसार, शोमध्ये काम करण्यासाठी तिला खूप कमी फी मिळत होती. ज्यावर जेव्हा तिला बोलण्याची इच्छा झाली तेव्हा तिला एक कॉल आला आणि ज्याने तिला बोलविले आणि सांगितले की जर ती कॉम्प्रोमाइज करण्यास तयार झाली तर तो तिची फी तीन पटीने वाढवेल.

यावर मानवीला खूप राग आला आणि त्या माणसावर ओरडायला लागली. मानवी म्हणाली, “हा शब्द कॉम्प्रोमाइज , मी हा शब्द सात आठ वर्षानंतर ऐकला. अचानक काय झाले ते मला कळले नाही आणि मी त्याच्यावर ओरडले. मी त्याला चांगले ऐकवले आणि म्हणाले, तुला हिम्मत कशी झाली मी पोलिसांकडे तक्रार करायला जात आहे.”

 

 

या संपूर्ण घटनेविषयी बोलताना अभिनेत्रीने आश्चर्य व्यक्त केले आणि म्हणाली, ‘मला खूप राग आला होता की मीटूच्या काळातही या सर्व गोष्टी चालू आहेत’.सयानी गुप्ता, कीर्ती कुल्हारी आणि बानी जे आणखी फोर मोर शॉट्समध्ये मानवी गागरूच्यासोबत दिसणार आहेत. याशिवाय या वेब सीरिजमध्ये प्रतीक बब्बर आणि मिलिंद सोमणही दिसणार आहेत. फोर मोर शॉट्सचा दुसरा सीझन १७ एप्रिल रोजी रिलीज होणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

या बातम्याही वाचा –

ब्रेकिंग बातम्यांसाठी पहा – www.hellomaharashtra.in

 

Leave a Comment