व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

प्रेमात अडसर ठरणाऱ्या आईचा मुलानेच केला निर्घुण खून

पुणे | प्रेमात पडलेल्या लोकांना कुणाचाही अडसर नको असतो. त्यांना अडचण निर्माण केला तर जन्मोजन्मीची नाती त्या प्रेमाच्या नात्यासाठी तुटली जातात. बऱ्याच वेळा खूनही झालेले बघायला मिळतात. अशीच एक घटना पुण्यामध्ये घडली आहे. आपल्या प्रेमाला अडसर ठरत असल्यामुळे, मुलाने प्रेमिकेच्या मदतीने आपल्या जन्मदात्या आईचाच खून केला. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पुण्यातील हवेली तालुक्यामधील खुर्द या गावचा विशाल राम वंजारी (19 वर्ष) हा रहिवासी आहे. त्याने त्याची प्रेयसी नॅन्सी गेब्रियल डोंगरे (26 वर्ष) हिच्या सोबत मिळून, त्याची आई सुशीला राम वंजारी (वय 38) यांचा खून केला. आईचा खून झाल्यानंतर पोलीस आल्यावर विशालही तिथेच होता. सुरुवातीला त्यांनी चुकीची माहिती देऊन पोलिसांना फसवले. पण त्याने दिलेल्या माहितीमध्ये वारंवार होत असलेल्या बदलांमुळे, पोलिसांचा संशय विशालवरती जास्त वाढला आणि मग पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर विशालने आपला गुन्हा कबूल केला.

विशालने पोलिसांना सांगितले की, त्याचे आणि नान्सी यांचे प्रेमसंबंध होते. पण या प्रेम संबंधांना आई सुशीला वंजारी यांचा विरोध होता. घरातून पैसे चोरन्यामुळे काही दिवसापूर्वी घरात मोठा वाद झाला होता. याचा राग मनात धरून विशालने आईच्या हत्येचा कट केला. त्याने नॅन्सी हिच्या मदतीने आईचा चाकूने हल्ला करून खून केला व मृतदेह घराबाहेर आणून टाकला. यानंतर खून झाल्याचा बनाव करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. नॅन्सी आणि विशाल या दोघांवर विविध कलमांतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.