हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची कोल्हापुरात भव्य सभा पार पडली. या सभेमध्ये त्यांनी अप्रत्यक्षपणे का होईना भाजपमध्ये सामील झालेल्या आमदारांवर टीका केली. मुख्य म्हणजे, कोल्हापूर हा हसन मुश्रीफ यांचा बालेकिल्ला असल्यामुळे शरद पवार त्यांना या सभेत त्यांना धारेवर धरतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र शरद पवारांना ऐवजी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी हसन मुश्रीफ (Hasan Musriff) यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच या अठरा वर्षाच्या काळात मुश्रीफ यांनी कोल्हापूरसाठी काय केले? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. त्यांच्या या टीकेवर आता हसन मुश्रीफ यांच्याकडून सडेतोड उत्तर देण्यात आले आहे. यामुळे जितेंद्र आव्हाड आणि हसन मुश्रीफ यांच्यातील वाद शिगेला गेला आहे.
जितेंद्र आव्हाड जाहीर सभेत काय म्हणाले?
कोल्हापूर येथील सभेत बोलताना आव्हाड मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधत म्हंटल, “महाराष्ट्रात आता गद्दारी दिसू लागली आहे. हे साप बिळात होते. बिळातले साप आता बाहेर पडू लागले आहेत. या सापांना ठेचण्यासाठी आपल्याला पायतानाचा वापर करावा लागेल. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे या कोल्हापुरात सर्वात प्रसिद्ध काय आहे? पायतान! या पायतानाचा उपयोग अख्या महाराष्ट्राने करावा अशी माझी इच्छा आहे” अशी जहरी टीका जितेंद्र आव्हाड यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर केली होती . त्यामुळे आता त्यांच्या या प्रत्युत्तरवर जितेंद्र आव्हाड काय प्रतिक्रिया देतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हसन मुश्रीफ यांनी काय उत्तर दिले?
जितेंद्र आव्हाड हे मला खूप ज्युनिअर आहेत. पवार साहेबांवर काय जादू त्यांनी केली माहित नाही. ठाण्यात पक्ष संपवण्याचे काम त्यांनी अनेक दिवसांपासून केलं आहे. त्यांनी अशी भाषा बोलायला नको होते. एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेल्यानंतर आम्ही सर्व ५३ आमदारांनी पत्र पाठवलं होते सत्तेत जाण्यासाठी तेव्हा तुम्ही सही कशी केली ? तेव्हा तुमचा पुरोगामी विचार कुठे गेला? असा प्रतिसवाल मुश्रीफ यांनी आव्हाडांना केला. तसेच कोल्हापूर चप्पल प्रसिद्ध नाही तर कापशीचे चप्पल प्रसिद्ध आहे, ती करकर वाजते, ती बसली कि त्यांना कळेल असा कडक शब्दात पलटवार मुश्रीफ यांनी केला.