‘देशाला पीएम आवास नकोय तर श्वास हवाय; राहुल गांधींचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यामध्ये केंद्र सरकार अपयशी ठरत असल्याची टीका सुरवातीपासूनच काँग्रेससह इतर पक्षांकडून केली जात आहे. आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून दोन फोटो शेअर करीत ‘देशाला पीएम आवास नकोय तर श्वास हवाय’, असं म्हंटल आहे

देशात कोरोनामुळे मृत्यूचेही प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत प्रधानमंत्री मोदी यांच्यावर वारंवार टीका करण्याचे काम विरोधकांकडून केले जात आहे. चोवीस तासात लाखो रुग्णांचा कोरोनामुळे देशात मृत्यू झाला आहे. या कोरोनाच्या मृत्यूच्या वाढत्या संख्येमुळे केंद्र सरकारवर ‘आयएमए’नेही टीका केली आहे. आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रधानमंत्री मोदी यांच्यावर निशाणा साधला. राहुल गांधी यांनी दोन फोटो ट्विट केले आहेत.

त्यातील एका फोटोत दिल्लीतील इंडिया गेट व त्याठिकाणी बांधकामासाठी करण्यात आलेले खोदकाम केले आहे. तर दुसऱ्या फोटोत नागरिकांनी तोंडावर मास्क लावले आहे. आणि ते राखली झालेले ऑक्सिजन सिलेंडर घेऊन ऑक्सिजनची रांगेत उभे राहिले आहेत,’ असे दोन फोटो शेअर करीत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

पंतप्रधानमंत्री मोदी यांच्यावर यापूर्वीही राहुल गांधी यांनी टीका केली आहे. ऑक्सिजन पुरवठा, लॉकडाऊन, कोरोनामुळे वाढत असलेले मृत्यूचे प्रमाण या कारणावरून राहुल गांधी यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. राहुल गांधी यांनी काल पंतप्रधान मोदींवर जीएसटीच्या वसुलीवरून ट्विट करून टीका केली होती. त्यामध्ये त्यांनी ‘एकीकडे लोकांचा जीव जात आहे. अशा परिस्थितीत दुसरीकडे प्रधानमंत्री मोदीजी यांचे जीएसटी वसूल करण्याचे काम काही केल्या थांबत नाही.’

You might also like