Elon Musk ने केलेल्या ट्विटमुळे क्रिप्टोकरन्सी Dogecoin शेअर्सच्या किंमतीत झाली 50% पेक्षा जास्त वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । इलेक्ट्रिक कार उत्पादक टेस्‍ला (Tesla) चे संस्थापक एलन मस्क (Elon Musk) गेल्या काही दिवसांपासून ज्या कंपन्यांबाबतीत ट्वीट करत आहेत, त्या त्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. मस्क यांनी गुरुवारी देखील एक असेच ट्विट केले आहे. यावेळी त्यांनी क्रिप्टोकरन्सी डॉगकॉईन (Dogecoin) च्या बाजूने अनेक ट्विट केले. ज्यामुळे या क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत 50 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. एलन मस्क हे सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. ट्विटरवर त्यांचे 4.45 कोटी फॉलोअर्स आहेत.

एलन मस्क यांनी अशा प्रकारच्या ट्वीटची मालिकाच सुरु केली
एलन मस्क यांनी डॉगकॉईनच्या समर्थनार्थ केलेल्या पहिल्या ट्विटमध्ये फक्त ‘Doge’ असे लिहिले. त्यानंतर त्यांनी ‘Dogecoin is the people’s crypto’ असे लिहिले. त्यानंतर त्यांनी ‘No Highs, No Lows, Only Doge’ असे लिहिले. यानंतर, या क्रिप्टोकरन्सीची किंमत वाढून 5 सेंटवर गेली. एलन मस्कच्या ट्वीटपूर्वी ते 3 सेंटवर ट्रेड करीत होते. याआधी देखील मस्क यांनी 20 डिसेंबर रोजी ‘One Word: Doge’ ट्विट केले होते. यानंतर त्याच्या किंमतीत 20 टक्के वाढ झाली. तसेच, ही क्रिप्टोकरन्सी ट्विटरवर ट्रेंड होण्यास सुरवात झाली.

त्यांना मस्कच्या ट्वीटचा देखील फायदा झाला
स्‍पेस-एक्‍स (SpaceX) चे संस्थापक एलन मस्क हे बिटकॉइनच्या बाजूने नव्हते, परंतु सोशल मीडिया अ‍ॅप क्लबहाऊसला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की,” मी 8 वर्षांपूर्वीच हे डिजिटल चलन खरेदी करायला हवे होते. मस्क म्हणाले, ‘आता मला असे वाटते की, बिटकॉइन ही चांगली गोष्ट आहे. मी उशीर केला आहे, परंतु मी बिटकॉइन सपोर्टर आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये जन्मलेल्या आणि व्यावसायिक अभियंता एलन मस्क यांनी गेमस्‍टॉप (Gamestop) च्या समर्थनार्थ ट्विट केले आणि त्याच्या शेअर्सची किंमत 680 टक्क्यांपेक्षा अधिकने वाढली. त्यानंतर त्यांनी रीटेल बेवसाइट एट्सी (Etsy) च्या समर्थनार्थ पोस्ट केली आणि त्या कंपनीच्या शेअर्समध्ये 8 टक्क्यांची वाढ झाली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment