हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनमध्ये गेल्या आठवड्यात एक बस तलावात पडल्याने मोठा अपघात झाला होता. या अपघातात २१ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर काही दिवसांनी आता एक मोठा धक्कादायक खुलासा झाला आहे. या अपघाताचा तपास करणाऱ्या पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. हा अपघात जाणूनबुजून घडविण्यात आला होता अशी माहिती त्यांनी दिली आहे.
एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, अपघातग्रस्त बसच्या ड्रायव्हरनेच हा अपघात घडवून आणल्याची माहिती पोलिसांनी तपासानंतर दिली आहे. त्याने वैयक्तिक रागातून हा प्रकार केल्याचे समोर आले आहे. ‘झांग नावाच्या त्या बस ड्रायव्हरचं घर जमीनदोस्त करण्यात आलं होतं. त्यामुळे तो प्रचंड नाराज होता. म्हणून त्याने जाणूनबुजून हा अपघात घडवला, त्याने दारुचं सेवन केल्याचंही स्पष्ट झालं आहे’, अशी माहिती पोलीस विभागाकडून सोशल मीडियाद्वारे देण्यात आली आहे.
सात जुलै रोजी चीनच्या गुईझू (Guizhou) प्रांतात रस्त्याच्या किनारी असलेल्या एका तलावात कॉलेजच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एक बस पडल्याने ड्रायव्हरसह २१ जणांचा मृत्यू झाला होता. तर, १५ जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत पोलीस तपास करत आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.