पोलिसांच्या गाडीत अचानक घुसून बकरी खाऊ लागली महत्वाची कागदपत्रे, पहा व्हिडीओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकताच एक असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे ज्याला पाहून तुम्हालाही खूप आनंद होईल. अमेरिकेतील राज्य जॉर्जियातील एका पोलिस अधिकाऱ्यालाही आश्चर्य वाटले जेव्हा त्याने आपली कार उघडली तेव्हा त्याच्या गाडीत एक बकरी बसलेली आढळली. एवढेच नाही तर ती बकरी आनंदाने त्याची महत्त्वाची कागदपत्रे खात होती.

या व्हायरल व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, डग्लस काउंटी शेरीफ ऑफिसचे डेप्युटी ऑफिसर त्यांच्या गाडीतून एका घरात त्यांचे महत्वाचे डॉक्युमेंट्स आणण्यासाठी आले. जेव्हा ते परत गाडीत आले तेव्हा त्यांना आत एक बकरी दिसली. ती बकरी आनंदाने कारच्या आत असलेली आवश्यक कागदपत्र खात होती. यानंतर त्यांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला.

यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्या अधिकाऱ्याने सांगितले की, ती ज्या घरांमध्ये दररोज जात असते, त्या दिवशीही ती तिथे गेली. यामुळे त्यांनी आपल्या कारचा दरवाजा उघडाच ठेवला. आपले काम संपल्यानंतर परत येताच त्यांना आपल्या गाडीच्या आत एक बकरी दिसली. ती आत मजा घेऊन पेपर खात होती.

त्यांनी सांगितले की, त्या बकरीला गाडीतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले, मात्र ती बराच वेळ आतमध्येच राहिली. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी लिहिले की, “मला आशा आहे की, व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर नक्कीच हसू उमटेल.” हा व्हिडिओ 4 सप्टेंबर रोजी शेअर केला गेला आहे. आणि आत्तापर्यंत त्याला कोट्यावधी लोकांनी पाहिले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”