हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आजपासून आपल्या देशातील लॉकडाउन हटविण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणू नियंत्रणात आला आहे असे मुळीच नाही. परंतु इम्रान खान यांचा असा युक्तिवाद आहे की जर पाकिस्तानमध्ये लॉकडाउन सुरु ठेवण्यात आला तर व्हायरसपेक्षा मोठा विनाश होईल कारण सरकारकडे पुरेसे पैसेच नाही आहे.
भारताचा शेजारी असलेल्या पाकिस्तानमध्ये पाच आठवड्यांनंतर पंतप्रधान इम्रान खान यांनी लॉकडाऊन हटवण्याची घोषणा केली आहे. लॉकडाऊनमध्ये परिस्थिती चांगली नसल्याचे इम्रानने सांगितले. सरकार आधीच मुश्किलीने चालू होते, त्यातच आम्ही सर्वांना पैसे देऊ शकत नाही. भारताशी तुलना केल्यास त्यांची परिस्थिती ही आमच्यापेक्षा चांगली होती, आम्ही बरीच रक्कम दिली आहे, परंतु आम्ही किती काळ पैसे देऊ शकतो. म्हणून आम्हाला लॉकडाउन हटवावा लागेल यातच शहाणपण आहे.
लॉकडाऊन उघडण्याची घोषणा करताना इम्रान भारताचा उल्लेख करायला विसरला नाही आणि त्याचा एकच हेतू होता की जनतेला हे दाखविणे कि पाकिस्तान हा भारतापेक्षा आपल्या जनतेची जास्त काळजी घेतो. पण इम्रान हे विसरला की २२ कोटी लोकसंख्या असलेला पाकिस्तान त्यांना हाताळण्यास सक्षम नाही आणि १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या भारताशी आपली तुलना करत आहे. कोरोना विषाणूचा भारत कसा सामना करीत आहे, याचा आदर्श संपूर्ण जग घेत आहे. भारताच्या पंतप्रधानांची उदाहरणे दिली जात आहेत.फक्त ५ आठवड्यांचा लॉकडाउनही पाकिस्तान सहन करू शकला नाही.
पाकिस्तानमध्ये लॉकडाऊनमुळे आतापर्यंत अडीच दशलक्ष कोटींचे नुकसान झाले आहे तर पंचवीस लाख रोजगार गमावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जगातील प्रत्येक देशासाठी कोरोना विषाणूचा सामना करणे एक आव्हान बनले आहे. परंतु पाकिस्तान हा उपासमारीच्या मार्गावर असलेला देश आहे, जिथे गेल्या अनेक महिन्यांपासून बेरोजगारीमुळे तसेच महागाईमुळे लोकांना त्रास झालेला आहे. आता या लॉकडाऊनमुळे पाकिस्तान सरकारचे कंबरडे मोडले गेले आहे.
८ मे पर्यंत पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची २५ हजाराहून अधिक प्रकरणे नोंदली गेली आहेत तर जुलैच्या मध्यापर्यंत पाकमध्ये कोरोना संसर्गाची २ लाख रुग्णांची नोंद होण्याचा अंदाज आहे. पाकिस्तानमध्ये कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत,परंतु एक सत्य हे ही आहे की कोणताही देश कायमचा लॉकडाउन ठेवू शकत नाही कारण प्रत्येकाला आपली अर्थव्यवस्था देखील चालवावी लागते. इम्रान सरकारने लॉकडाऊन वेगवेगळ्या टप्प्यावर उघडण्याची घोषणा केली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.