औरंगाबाद प्रतिनिधी | बहीण-भावाच्या निर्घृण हत्येने शहराला हादरवून टाकले होते. या हत्येमागील रहस्य उलगडले असून घरात ठेवलेल्या किलोभर सोन्यासाठी चुलत भाऊ आणि त्याच्या मेहुण्यानेच ही हत्या केल्याचे स्पष्ठ झाले आहे. गुन्हेशाखेच्या पथकाने दोन्ही आरोपिना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून चोरी गेलेला माल पोलिसांनी जप्त केला आहे. सतीश काळूराम खंदाडे (रा.पाचन वडगाव), अर्जुन देवचंद राजपूत (रा.वैजापूर,) असे अटकेतील दोघांची नावे आहेत. अटकेतील आरोपी सतीश हा मायताचा चुलत भाऊ आहे तर अर्जुन हा त्याचा मेहुणा आहे.
या घटने बाबत अधिक माहिती अशी की, शहरातील सातारा परिसर भागात गुरुवारी किरण खंदाडे-राजपूत वय-18, सौरभ खंदाडे-राजपूत वय-16 यांची राहत्याघरी गळा चिरून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी गाठत तपासला सुरुवात केली होती. त्यावेळी घरात चार चहा चे कप पोलिसांना आढळले होते, त्यावरून ओळखीच्या किंवा जवळच्या व्यक्तीनेच ही हत्या केली असावी असा दाट संशय पोलिसांना होता. त्यावरून पोलिसांनी दोन्ही मायताच्या मोबाईल क्रमांकाची तपासणी सह शास्त्रशुद्ध पद्धतीने तपासाला सुरुवात केली. त्यानंतर चुलत भाऊ सतीश आणि त्याचा मेहुणा अर्जुन या दोघांवर पोलिसांना संशय आल्याने दोघांनाही विचारपूस करण्यात आली. विचारपूस दरम्यान दोघेही सुरुवातीला तोंड उघडण्यास तयार नव्हते त्या नंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच दोघांनीही गुन्ह्याची कबुली देत ही निर्घृण हत्या घरातील सोन्यासाठी केली असल्याची कबुली दिली. गुन्हेशाखेच्या पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून त्यांच्या ताब्यातून चोरी केलेलं सोन जप्त करण्यात आलं आहे.
हत्येला कौटुंबिक भांडणाची किनार..
मयत किरण आणि सौरभ यांचा परिवार आणि आरोपी सतीश यांच्या परिवारात शेती वरून वाद सुरू होते. या वादातूनच आरोपी सतीश ने हत्येचा कट रचला असावा अशी चर्चा आहे. हत्या केल्यानंतर घरात सोने असल्याची माहिती सतीश ला असावी त्यामुळे चोरी चा बनाव या मारेकऱ्यांनि केला असावा अशी देखील शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र सध्या स्थितीत चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. कोठडी दरम्यान पुढे या प्रकरणातील अनेक अंग समोर येण्याची शक्यता आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.