हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नथुरामवादी सरकारला आता गांधीवादी सरदार वल्लभभाई पटेल यांची अडचण वाटू लागल्याने त्यांनी स्टेडियमचे नाव “नरेन्द्र मोदी स्टेडियम” केलं आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी “हॅलो महाराष्ट्र” सोबत बोलतांना केली. जगातील सर्वात मोठं स्टेडियम असा नावलौकिक मिळवलेलं मोटेरा स्टेडियमचे नाव आता नरेंद्र मोदी स्टेडियम करण्यात आलं आहे. या स्टेडियमचं औपचारिक उद्घाटन आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आलं. हे स्टेडियम सरदार पटेल स्पोर्टस इन्क्लेव्हचा भाग आहे.
यावर बोलतांना लवांडे म्हणाले की “गुजरात मधील मोटेरा रोड वरील सरदार पटेल यांच्या नावाने असलेले स्टेडियम १९८३ साली तत्कालीन सरकारने निर्माण केलेले आहे. गांधीवादी असलेल्या सरदार पटेलांचा भव्य पुतळा उभारून त्यांचे कोणतेही विचार मान्य नसलेल्या नथुरामवादी भाजपला आता सरदार पटेलांचीच अडचण वाटत असावी म्हणून त्या स्टेडियमला त्यांचे नाव बदलून आज राष्ट्रपतींच्या हस्ते नरेंद्र मोदी स्टेडियम असे नामकरण करण्यात आले. हा सरदार पटेलांचा भाजपने जाहीर अवमान केलेला आहे. त्याचा आम्ही निषेध करतो.
माननीय राष्ट्रपती महोदयांना नामकरण करतांना काहीच कस वाटलं नाही ? त्यांनी तरी सरदार पटेलांचा नाव पुसून असा अवमान करायला नको होता. ६ वर्षात भारतात काहीही नवनिर्माण करता आलेले नाही, देशाची सुरळीत असलेली अर्थव्यवस्था पूर्ण खिळखिळी करून देश कर्जबाजारी केला , अभूतपूर्व महागाई ,बेरोजगारी वाढवली , शेतकरी सोबत नाहीत त्यामुळे भविष्यात पुन्हा सरकार येईल किंवा नाही याची भाजपला खात्री नसल्याने कदाचित असे नामकरण सोहळे सुरू केले असावेत.
जे स्टेडियम आपण निर्माण केले नाही. तिथे आपले नाव नकोच अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतील काय ? असा सवाल विचारत नामकरण सोहळ्यावर टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी केली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.