हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात धुव्वाधार पावसामुळे महापूर आला. अनेक ठिकाणी लोकांचे पुनर्वसन करण्यात आले.काही ठिकाणी दरड कोसळून जीवितहानी झाली. या सर्व घटनेनंतर राज्य सरकार सर्व पूरग्रस्तांना मदत करेल असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. पूरग्रस्तांना दोन दिवसात आर्थिक मदतीची घोषणा करण्यात येईल असे अजित पवारांनी सांगितले. ते सांगली येथे बोलत होते
अद्याप सर्व पंचनामे पुर्ण झाले नाही. जसंजसं पाणी ओसरत जाईल तसं नवीन नुकसानीची नोंद करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना सर्व सूचना देण्यात आल्या आहेत. या सर्व जिल्ह्यांतून येत्या दोन दिवसांत पंचनामे पुर्ण केल्यानंतर नुकसानग्रस्त नागरिकांना त्वरित मदत केली जाईल असे अजित पवारांनी सांगितले.
संकटे येत असतात पण त्या संकटांवर मात करण्याची ताकद महाराष्ट्रामध्ये आणि राज्य सरकार मध्ये आहे त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. पण आता केंद्राने केंद्राची जबाबदारी पार पदवी राज्य सरकार राज्याची जबाबदारी पार पाडण्यात थोडही कमी पडणार नाही अशी ग्वाही अजित पवारांनी दिली.
SDRF ची एक टीम कराडला ठेवण्याचा विचार सुरु
राज्यात दरवर्षी अशाप्रकारे संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे राज्यात एसडीआरएफची एक टीम कराडला ठेवता येईल का याचा विचार सुरु आहे. रायगडला एक टीम ठेवली जाण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. NDRFच्या धर्तीवर राज्यात SDRF तैनात राहणार, असं अजित पवार म्हणाले.