जम्मू-काश्मीरच्या निवडणुका कधी होणार?, सुप्रीम कोर्टाने केंद्राला फटकारले

supreme court
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या राज्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्षांनी आपापल्या पातळीवर आगामी निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. अशातच जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) निवडणुका कधी पार पडतील असा प्रश्न थेट सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) उपस्थित करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवून आता चार वर्षे उलटून गेली आहेत. या कलमा विरोधात सर्वोच्च न्यायालयाकडे अनेक याचिका दाखल झाल्या आहेत. या याचिकांची सुनावणी सुरू असतानाच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड (Dhananjaya Chandrachud) यांनी जम्मू काश्मीरच्या निवडणुकांबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.

न्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी जम्मू काश्मीरमधील निवडणुकांचा प्रश्न उपस्थित करत केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले. 370 कलम हटवून चार वर्षे लोटत आली तरी देखील निवडणुका घेण्यात आल्या नाहीत. यातून लोकशाही प्रक्रिया या राज्यात ठप्प झाल्याचे स्पष्ट होते असे चंद्रचूड यांनी केंद्राला सुनावले आहे. सध्या 370 कलम हटवल्याच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेच्या सुनावणी वेळी चंद्रचूड यांनी हे प्रश्न उपस्थित केले.

यावेळी बोलताना त्यांनी, जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवून बराच काळ लोटून गेला असताना देखील अद्याप निवडणुका का झाल्या नाही असा प्रश्न केंद्राला विचारला? यावर उत्तर देत, “तुम्ही निवडणुका कधी घेणार आहात? त्यावर तुषार मेहता म्हणाले, निवडणुकांची तयारी सध्या सुरु आहे, आम्ही निवडणुका घेण्याच्या दिशेने चाललो आहोत” असे केंद्राच्या बाजूने तुषार मेहता यांनी म्हणले. परंतु, लोकशाही प्रक्रिया राज्यात सुरू होणे महत्वाचं आहे, त्यासाठी रोडमॅप तयार करा असे आदेश चंद्रचूड यांनी दिले.

दरम्यान, राज्यांमध्ये पुढच्या वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी सर्व पक्षांकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. मात्र या लोकसभा निवडणुकांपूर्वीच जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुका होऊ शकतात. त्यामुळे पुन्हा जम्मू कश्मीरमधील वातावरण तापू शकते. जम्मू कश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर आता कुठे जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये जम्मू कश्मीर महत्वाचे केंद्र बनेल.