‘फेअर अँड लव्हली’ मधून काढला जाणार फेअर हा शब्द 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘फेअर अँड लव्हली’ या फेअर नेस क्रीमच्या नावातून आता फेअर हा शब्द काढला जाणार आहे. असे सांगत मराठमोळी सोनाली कुलकर्णी यांनी याबाबत आनंद व्यक्त केला आहे. आपण आशिया खंडात राहतो तसेच आपल्या मातीशी आणि हवामानाशी नातं सांगणारा आपला रंग आहे. आणि भारतीय वर्ण हा आतंरराष्ट्रीय सिनेमांमध्ये साजरा केला जातो असे म्हणत एचयूएल या कंपनीच्या टीमने एक सकारात्मक विचार करून हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खूप आनंद झाल्याचे तिने सांगितले आहे.

‘विदेशी गोरपणाच्या आकर्षणाला भाळून आपण आपल्या रंगाला नाकारतो आहोत. आणि गोरे होण्याचे वेगवेगळे प्रयोग करतो आहोत. नाटक सिनेमामध्ये कधीच रंगाची समस्या येत नाही. उलट मेकअप आर्टिस्ट एक शेड डार्कर मेकअप करतात. जे नवशिखे असतात ते गोरे बनवायला जातात. आणि कलाकार खाऱ्या दाण्यासारखा दिसतो, असे या व्हिडिओत त्या म्हणाल्या आहेत. या निर्णयाच्या निमित्ताने सामान्य माणसाला जो सुंदर असण्याचा आणि गोरे दिसण्याचा जो कॉम्प्लेक्स असतो तो या निमित्ताने निवळेल. अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.

 

आपल्याला नेहमीच असं वाटतं की कलाकारांना त्यांच्या रंगाचा न्यूनगंड असेल. पण त्याहीपेक्षा सामान्य व्यक्तीला सुंदर असण्याचा, गोरं दिसण्याचा जो न्यूनगंड आहे तो आता फेअर हा शब्द काढून टाकल्याने नक्कीच कमी होईल अशी आशा आपण करूया,” असं ती पुढे म्हणाली. गोरं होण्यासाठी या क्रीमचा वापर करा अशी जाहिरात करत असल्याने वारंवार फेअर अॅण्ड लव्हली ब्रॅण्डवर टीका झाली आहे. जाहिरातीमधून रंगभेद होत असल्याची टीकाही वारंवार झाली आहे. अनेक सेलिब्रिटींनी याच कारणामुळे याची जाहिरात करण्यास नकारही दर्शवला होता. त्यामुळे अखेर कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.