‘या’ कारणांमुळे सोन्याच्या दरात होते आहे वाढ; घ्या जाणुन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  सोमवारी सोन्या चांदीच्या दरात घट झाल्यानंतर मंगळवारी मात्र सोने-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव ७६१रु वाढला आहे. तर चांदीच्या किंमतीत १,३०८ रुपयांची वाढ झाली आहे. सोमवारी सोन्याच्या दरात ३८०रु घट झाली होती. आज सोन्याचा भाव ४८,४१४ रु प्रति १० ग्रॅम नोंदविण्यात आला आहे. तर चांदीचा आजचा भाव ४९,२०४ रु प्रति १ किलोग्रॅम नोंदविण्यात आला आहे.

संकटकाळात काहीच पर्याय नसताना लोक सोने गहाण ठेवून कर्ज घेतात याला गोल्ड लोन म्हणतात. पूर्वी लोक सराफांकडे सोने ठेवत असत आता काही बँका देखील गोल्ड लोन ची स्कीम चालवतात. तर काही स्रोतदेखील आहेत जे सोने ठेवून कर्ज देतात. सध्या एसबीआय ने देखील गोल्ड लोनसाठी स्कीम दिली आहे. एसबीआय योनो ऍप द्वारे देखील या स्कीमचा फायदा घेता येणार आहे.

एसबीआय गोल्ड स्कीम नुसार २० हजार पासून २० लाखापर्यंत चे कर्ज घेता येऊ शकणार आहे. सध्या या कर्जासाठी ७.७५% वार्षिक व्याज आहे. १५ जुलै पर्यंत ही स्कीम राहणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment