नवी दिल्ली । उद्यापासून देशभरात दैनंदिन व्यवहारातल्या गोष्टींचे नियम बदलणार आहेत. त्यात असे काही बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होईल. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला त्यासंबंधिची माहिती देत आहोत. अशा परिस्थितीत, जर तुम्ही त्याकडे लक्ष न दिल्यास तुमचे नुकसान होऊ शकते. चला तर मग या नवीन नियमांबद्दल जाणून घेउयात …
1. LPG डिलिव्हरीचे नियम बदलतील
1 नोव्हेंबरपासून LPG सिलेंडरच्या डिलिव्हरीच्या नियमात बदल होणार आहेत. तेल कंपन्या 1 नोव्हेंबरपासून डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (डीएसी) सिस्टीम लागू करणार आहेत. म्हणजेच गॅस डिलिव्हरीच्या आधी ग्राहकांच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर एक ओटीपी पाठविला जाईल. जेव्हा सिलेंडर आपल्या घरी येईल तेव्हा तो ओटीपी डिलिव्हरी बॉयबरोबर शेअर कराव लागेल जेव्हा ओटीपी सिस्टमशी जुळेल फक्त तेव्हाच सिलेंडर डिलिव्हर केला जाईल.
2. इंडेन गॅसने बुकिंग नंबर बदलला
आपण इंडेनचे ग्राहक असाल तर यापुढे आपण जुन्या क्रमांकावर गॅस बुक करू शकणार नाही. इंडेनने आपल्या एलपीजी ग्राहकांना त्यांच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर गॅस बुकिंगसाठी एक नवीन नंबर पाठविला आहे. आता इंडेन गॅसच्या ग्राहकांना LPG सिलेंडर बुक करण्यासाठी 7718955555 वर कॉल किंवा एसएमएस पाठवावा लागेल.
3. गॅस सिलेंडरच्या किंमती बदलतील
राज्यातील तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला LPG सिलेंडरच्या किंमती ठरवतात. यावेळी किंमती वाढू देखील शकतात आणि कमी देखील होऊ शकतात. अशा परिस्थितीत 1 नोव्हेंबरला सिलेंडरच्या किंमती बदलल्या जातील. ऑक्टोबरमध्ये तेल कंपन्यांनी कमर्शियल सिलेंडरर्सच्या किंमतीत वाढ केली होती.
4. ट्रेनचे टाईम टेबल बदलतील
रेल्वेने प्रवास करणार्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. 1 नोव्हेंबरपासून भारतीय रेल्वे देशभरातील गाड्यांचे वेळापत्रक बदलणार आहे. 1 नोव्हेंबरपासून गाड्यांचे नवीन वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यामुळे 13 हजार प्रवासी आणि 7 हजार मालवाहतूक करणार्या गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात येणार आहेत. 1 नोव्हेंबरपासून देशातील 30 राजधानी गाड्यांचे वेळापत्रकदेखील बदलणार आहे. त्याचबरोबर तेजस एक्स्प्रेस चंदिगड ते नवी दिल्ली दरम्यान धावेल आणि दर बुधवारी 1 नोव्हेंबरपासून सुटेल.
5. SBI बचत खात्यावर कमी व्याज
1 नोव्हेंबरपासून SBI चे काही महत्त्वपूर्ण नियम बदलणार आहेत. आता SBI च्या बचत खात्यांना कमी व्याज मिळेल. आता 1 नोव्हेंबरपासून बचत खाते खात्यावर 1 लाख रुपयांपर्यंत जमा झालेले व्याज दर 0.25 टक्क्यांनी कमी करून 3.25 टक्के केले जाईल. तर, 1 लाखाहून अधिक रकमेच्या ठेवींवर आता रेपो रेटनुसार व्याज मिळेल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.