हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगात सर्वत्र कोरोनाव्हायरसचा उद्रेक सुरू आहे. ज्यामुळे लोक त्यांच्या घरीच आपला वेळ घालवत आहेत. भारतातही कोरोना वाढू नये म्हणून लॉकडाउन सुरू आहे, अशा परिस्थितीत लोकांना अनेक संकटांनाही सामोरे जावे लागत आहे, परंतु कोरोना संकटावर मात करण्यासाठी लोक एकमेकांना सर्व प्रकारे सहकार्य करीत आहेत.
बॉलिवूड सेलिब्रेटीसुद्धा या लॉकडाउनच्या दिवसात आपल्या कुटुंबियांसमवेत घरी असून त्यांच्या चाहत्यांना सतत घरीच राहण्याचा सल्ला देत असतात. दरम्यान, अभिनेत्री अदा शर्माचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती घरीच मास्क कसा तयार कराव हे शिकवत आहे. अदा शर्माने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती मोज्याच्या सहाय्याने फेसमास्क बनवताना दिसत आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये अदाने तिच्या चाहत्यांना व्हिडिओ पाहण्याचे आवाहन केले आणि लिहिले की, “पुन्हा एकदा म्हणते घराबाहेर जाऊ नका, पण काही कारणास्तव घराबाहेर जायचेच असेल तर आपण मास्क घालायलाच पाहिजे.” . आणि आपल्याकडे मास्क नसल्यास हा व्हिडिओ जरूर पहा. “
अदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लोकही तिच्या या कल्पनेचे कौतुक करीत आहेत. देशात आतापर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गाची एकूण ८,४४७ प्रकरणे नोंदली गेली आहेत, त्यापैकी ७,४०९ पॉझिटिव्ह प्रकरणे आहेत आणि ७६४ लोक बरे झाले आहेत आणि त्यांच्या घरी गेले आहेत. त्याचवेळी या साथीमुळे आतापर्यंत २७३ लोकांचा मृत्यू झाला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.