हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी सामान्य माणूस दररोज नवनवीन शक्कल लढवत आहे. आता या लिंकमध्येच केरळ सरकारची कंपनी असलेली केरळ राज्य कोअर कॉर्पोरेशन देखील जोडली गेलेली आहे. केएससीसीने नुकतेच नारळाच्या शेंड्यांपासून चटई बनवल्या आहेत ज्यामध्ये सॅनिटायजेशनची देखील सुविधा आहे. याच वैशिष्ट्यामुळे या चटाया चप्पल आणि बुटांच्या माध्यमातून कोरोनाला घरात शिरकाव करण्यापासून प्रतिबंध करतील. यामुळे लोकांना कोविड -१९ पासून संरक्षण मिळणार आहे आणि तसेच दुसरीकडे संथ अर्थव्यवस्थेतील व्यवसायाला संकटात दिलासा मिळेल. त्यांना अँटी कोविड हेल्थ प्लस मॅट असे नाव देण्यात आलेले आहे. केरळचे अर्थमंत्री थॉमस आयझॅक यांच्या म्हणण्यानुसार कोविड -१९ मुळे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात नारळांच्या शेंड्यांपासून बनवलेल्या उत्पादनांची मागणी कमी झाली तेव्हा नवीन उत्पादनांच्या आयडियावर काम सुरू झाले. त्याची किंमत २०० रुपये आहे.
आयझॅक म्हणाले की, आर्थिक वर्ष २०२० मध्ये राज्यात कॉयरचे उत्पादन जवळपास तीन पटीने वाढून २०,००० टन्स झाले आहे, जिथे की शेजारचे राज्य असलेले तामिळनाडू लॉकडाऊनमध्ये होते. फायबरच्या आवश्यकतेसाठी केरळ हे तामिळनाडूवर अवलंबून आहे.
वैशिष्ट्याबद्दल जाणून घ्या
हिंदू बिझिनेस या इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार नॅशनल कोअर रिसर्च अँड मॅनेजमेंट (एनसीआरएमआय) आणि श्रीचित्र तिरुनल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल सायन्स अँड टेक्नॉलॉजीने मिळून ही नारळाने बनलेली चटई विकसित केली आहे. हे काम दोघांनीही गेल्या दीड महिन्यात केले आहे. या मॅट्सवर सॅनिटायझिंग सॉल्व्हन्ट असल्याने त्याच्यावर शूज आणि चप्पल घासल्यानंतर कोरोना घरात प्रवेश करू शकणार नाही. ही चटई किटसह विकली जाईल, ज्यामध्ये ट्रे आणि सेनिटायझर्स असतील.
आयझॅक यांनी सांगितले की कंपनी अलाप्पुझा येथे नवीन चटईची फील्ड ट्रायल घेईल आणि जुलैपासून त्याची विक्री सुरू करेल. पहिल्या टप्प्यात अँटी कोविड हेल्थ प्लस चटई प्रत्येक पंचायत, नगरपालिका संस्था आणि संबंधित संस्थांमध्ये दिल्या जातील. दुसर्या टप्प्यात ते सर्वसामान्यांना उपलब्ध होतील. कॉयर बोर्डाच्या सहकार्याने कोविड -१९ रूग्णांसाठी कॉयर कॉट आणि युझ अँड थ्रो मॅट्रेस बनवण्याची कंपनीची योजना आहे तसेच ही उत्पादने स्वस्त दरात उपलब्ध करुन दिली जातील.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.