मुंबई । देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा समावेश झाला आहे. या यादीत ७६.५२ % पसंती त्यांना मिळाली आहे. त्यांचा या यादीत पाचवा क्रमांक लागला आहे. आयएएनएस आणि सी व्होटर यांनी संयुक्त रित्या हे सर्वेक्षण केले आहे. ही यादी जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर
अकॉउंटवरून सर्वांचे आभार मानले आहेत. त्यांनी ‘हे’ यश शिवरायांचे राज्य पुढे नेण्यासाठी मला साथ देणार्या प्रत्तेकाचे’ असे ट्विट केले आहे.
“लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत माझा समावेश झाला, हे माझे एकट्याचे यश नाही. सहा महिन्याच्या काळात शिवरायांचे हे राज्य पुढे नेण्यासाठी मला साथ देणाऱ्या प्रत्येकाचे यश आहे. मुख्यमंत्रीपद हे निमित्त आहे. महाराष्ट्राची सेवा घडत आहे हे महत्वाचे. लोकप्रियतेत माझा वरचा नंबर येण्यापेक्षा महाराष्ट्र जगभरात पहिल्या क्रमांकाचे राज्य कसे करता येईल हेच माझे ध्येय आहे.” असे त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत महाराष्ट्रातील जनता, मंत्रिमंडळातील सहकारी आणि सर्वे अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील जनता, मंत्रिमंडळातील सहकारी आणि सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे निवेदन: pic.twitter.com/cgSARFVC65
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) June 4, 2020
दरम्यान देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत एकही भाजपा मुख्यमंत्री नाही आहे. यामध्ये ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बहेल, केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन आणि आंध्र प्रदेश चे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचा अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा आई चौथा क्रमांक लागला आहे. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या नियुक्तीची चर्चा चांगलीच रंगली होती. त्यांना मुख्यमंत्रीपद ग्रहण करून केवळ सहा महिन्यांचा कालावधी झाला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.