आपले जुने वाहन नोंदणी करणे बाकी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | बऱ्याचदा अनेक लोक आपले वाहन जुने झाले तरी, त्याची नोंद करून घेत नाहीत. अथवा ‘सेकंड हॅन्ड’ गाडी घेतली तर, तिची नोंदणी मागे पडून जाते. आपल्याकडेही अशी नोंदणी नसलेली गाडी असेल तर त्याची पटकन नोंदणी करून घ्या! सरकारची नवीन सूचना एप्रिलपर्यंत येण्याची शक्यता आहे. त्यानंतर अशा गाड्यांना स्क्रॅप म्हणून घोषित करण्यात येऊ शकते.

बजेटमध्ये स्क्रॅप नीतीवर मोठ्या प्रमाणात लक्ष दिले गेल्याचे दिसून येते. यानंतर परिवहन विभागाने जुन्या वाहनांची यादी तयार करण्याचे काम सुरू केले आहे. एप्रिलपासून रस्त्यावर बंद पडून असलेली वाहने रस्त्यावरून उचलून मोकळ्या ठिकाणी हलवली जातील. वीस वर्षापेक्षा जास्त जुन्या वाहनांमध्ये दोन चाकी गाड्यांचा समावेश जास्त आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पंधरा वर्षांपेक्षा जास्त जुन्या गाड्यांचे रजिस्ट्रेशन थांबवले गेले होते. त्यानंतर परिवहन विभागाने यांचे रजिस्ट्रेशन करण्याची विनंती केली होती. परंतु ही विनंती अजून स्विकारली नसल्यामुळे अनेक वाहनांची नोंदणी तशीच पडून आहे. नवीन नियम आल्यास या वाहनांना रस्त्यावरून चालवण्याची परवानगी नसेल.

जुन्या वाहनांमुळे प्रदूषणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. सोबतच, असे वाहने रस्त्यामध्ये बंद पडल्यामुळे वाहतुकीमध्येही अडचण येते. त्यामुळे, अशा वाहनांना वाहतुकीसाठी बंदी अणण्यासाठी शासन विचारशील आहे. सध्या कुठलीही गाईडलाईन परिवहन विभागाला शासनाकडून प्राप्त झाली नाही. त्यामुळे जुन्या वाहनांची माहिती मिळवणे सध्या सुरू आहे. मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत माहितीचे संकलन होऊन एप्रिल अखेर कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment