हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Income Tax : जर आपण नोकरदार असाल आणि कर वाचवण्यासाठी एखादा पर्याय शोधत असाल आजची ही बातमी आपल्यासाठी खूपच महत्वाची ठरेल. प्रत्येक पगारदार व्यक्ती जो टॅक्सच्या कक्षेत येतो त्याने आर्थिक वर्ष संपण्या आधीच आपल्या गुंतवणूकीचे योग्य नियोजन करणे महत्वाचे असते. हे लक्षात घ्या कि, आपल्याला 31 मार्चपर्यंत कर बचत योजनेमध्ये गुंतवणूक करून आयटीआर मध्ये कपातीसाठी क्लेम करता येईल. आपल्याकडे अशा अनेक योजना आहेत, ज्यामध्ये गुंतवणूक करून टॅक्स वाचवता येऊ शकेल. तर आज आपण अशा काही टिप्सबाबतची माहिती जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये गुंतवणूक करून टॅक्स सूटचा लाभ मिळू शकेल.
भविष्य निर्वाह निधी (PF)
ज्यांना रिटायरमेंटनंतरच्या आयुष्यासाठी प्लनिंग करायचे आहे त्यांच्यासाठी ही योजना जास्त फायदेशीर आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) मध्ये योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांना कलम 80C अंतर्गत कर सवलत मिळवता येते.
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF)
PPF ही कर सवलत देण्याऱ्या सर्वात लोकप्रिय योजनांपैकी एक मानली जाते. याद्वारे आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलत मिळते. यामध्ये जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांची वार्षिकरित्या गुंतवता येतात. Income Tax
इन्शुरन्स पॉलिसी
हेल्थ इन्शुरन्स स्कीममध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांना 80D अंतर्गत कर सवलत मिळते. यामध्ये, 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांच्या सूटशिवाय, 25,000 रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळते.
होम लोन
जर आपण होम लोन घेतले असेल तर आपल्याला आयकराच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या मूळ परतफेडीसाठी वजावटीसाठी क्लेम करता येईल. याशिवाय होम लोनवर भरलेल्या व्याजावर देखील कलम 24B अंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतची अतिरिक्त कर सवलतही उपलब्ध असेल. Income Tax
इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम म्हणजेच (ELSS)
ELSS फंड ही एकमेव अशी म्युच्युअल फंड स्कीम आहे ज्यामधील गुंतवणुकीवर कर सवलत मिळू शकेल. यामध्ये इन्कम टॅक्स कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांची कर सवलत मिळेल. यामध्ये 100 रुपयांच्या SIP द्वारे गुंतवणूक सुरु करता येते. तसेच यामध्ये सरासरी 10 ते 12 टक्के रिटर्न मिळत आहे.
नॅशनल पेन्शन स्कीम (NPS)
NPS ही सरकारची कर बचत योजना आहे. याद्वारे कलम 80CCD अंतर्गत जास्तीत जास्त 2 लाख रुपयांची कर सवलत मिळू शकेल. यामध्ये कलम CCD(1) अंतर्गत 1.5 लाख रुपये आणि CCD(1B) अंतर्गत 50,000 रुपयांची अतिरिक्त कर सवलतीचा समावेश आहे. Income Tax
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.incometax.gov.in/iec/foportal/
हे पण वाचा :
CIBIL Score म्हणजे काय ??? याचा कर्जाच्या पात्रतेवर कसा परिणाम होतो ते समजून घ्या
HDFC कडून होम लोनवरील व्याज दरात वाढ, आता ग्राहकांना द्यावा लागणार जास्त EMI
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् डेटा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत वाढ, जाणून घ्या आजचा नवीन भाव
Ayushman Bharat Yojana : केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळवा 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, अशा प्रकारे तपासा पात्रता