हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्याच्या भावात सध्या वाढ होत आहे. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या कमकुवतपणामुळे दिल्लीत गुरुवारी 10 ग्रॅम सोन्याच्या किंमती या 118 रुपयांनी वाढल्या आहेत. मात्र, सोन्याच्या वाढीविरूद्ध चांदीच्या किंमती खाली आल्या आहेत. आज एक किलो चांदीची किंमत 2384 रुपयांनी खाली आली. एचडीएफसी सिक्युरिटीच्या मते, देशांतर्गत इक्विटी बाजारातील कमकुवतपणा आणि अमेरिकन चलनाच्या मजबुतीमुळे सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. सोन्याने आपली मागील उच्च पातळी तोडून एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. तो आपल्या सर्वकालीन उच्च स्तरावर व्यापार करीत आहे.
सोन्याचे नवीन दर
गुरुवारी दिल्ली सराफा बाजारात 99.9 टक्के शुद्धतेसह सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 53,742 रुपयांवरून वाढून 53,860 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. या काळात प्रति 10 ग्रॅमच्या किंमती 118 रुपयांनी वाढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने प्रति औंस 1,956 डॉलर होते.
चांदीचे नवीन दर
गुरुवारी चांदीचे दर अत्यंत खाली आले आहेत. दिल्लीत एक किलो चांदीची किंमत 66,484 रुपयांवरून 64,100 रुपयांवर आली आहे. या काळात चांदीच्या किंमतींमध्ये 2,384 रुपयांनी घट झाली आहे.
26 वर्षांत सोन्याची मागणी सर्वात कमी झाली
भारतात सोन्याची मागणी गेल्या 26 वर्षात सर्वात कमी झाली आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिल डब्ल्यूजीसीच्या नव्या अहवालामध्ये हि भीती व्यक्त केली जात आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे वेगाने वाढलेले सोन्याचे भाव आणि कोरोना विषाणू हे सांगितले जात आहे. भारतातील एप्रिल ते जून या तिमाहीत सोन्याची मागणी 70 टक्क्यांनी घसरून 63.7 टनांवर आली आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या (डब्ल्यूजीसी) अहवालात असे म्हटले आहे की, कोविड -१९ च्या कारणामुळे देशात सुरु पडलेल्या लॉकडाऊनमुळे सोन्याची मागणी कमी झाली आहे. मागील वर्षी म्हणजेच 2019 च्या दुसऱ्या तिमाहीत भारतामध्ये सोन्याची मागणी 213.2 टन होती. डब्ल्यूजीसीच्या ‘दुसर्या तिमाहीत सोन्याच्या मागणीच्या भूमिकेविषयीच्या अहवालात’ असे म्हटले आहे की, दुसर्या तिमाहीत सोन्याची मागणी 57 टक्क्यांनी घटून 26,600 कोटी रुपयांवर गेली आहे, जी गेल्या वर्षी याच तिमाहीत 62,420 कोटी रुपये होती..
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठीआम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.