आज रेशनकार्डशी संबंधित ‘हे’ काम करणे फार महत्वाचे आहे, अन्यथा मिळू शकणार नाही फ्री रेशन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र । जर तुम्हाला विनामूल्य रेशन मिळवायचे असेल आणि अजूनही तुम्ही रेशनकार्डला आधार (Ration & Aadhaar Card Link) शी लिंक केलेले नसेल, तर आता आपल्यासाठी हे अवघड होऊन जाईल. वस्तुतः अन्न मंत्रालयाने रेशनकार्डांना आधारशी जोडण्यासाठीची मुदत ही 30 सप्टेंबरपर्यंत वाढविली होती. त्यानुसार रेशनकार्डला आधारशी जोडण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. रेशन कार्डच्या माध्यमातून लाभार्थ्यांना स्वस्त दरात अनुदानीत धान्य मिळते. रेशन कार्डला आधारशी (Process to Link Ration Card With Aadhaar) कसे लिंक करता येईल ते जाणून घेउयात.

लिंक करण्याची पद्धत
1. भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी (UIDAI वेबसाइट) नुसार रेशनकार्डधारकास आपल्या आधारसह कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आधार कार्डची एक कॉपी आणि रेशनकार्डची एक कॉपी पीडीएस अर्थात रेशन वाटप करणाऱ्या दुकानात पाठवावी लागेल.

  1. पासपोर्ट आकाराचा कुटुंब प्रमुखाचा फोटोदेखील द्यावा लागेल.

  2. तुमचा तपशील व आधार क्रमांक जुळवण्यासाठी पीडीएस दुकानामध्ये रेशनकार्डधारकास बायोमेट्रिक मशीन किंवा सेन्सरवर बोट ठेवण्यास सांगितले जाऊ शकते.

  3. रेशनकार्ड ज्याच्या नावावर असेल, त्याचे बँक खाते जर आधार कार्डशी जोडलेले नसेल तर त्याला पीडीएस दुकानात आपल्या बँक खात्याच्या पासबुकची फोटोकॉपी देखील जमा करावी लागेल.

  4. आधार रेशनकार्डशी लिंक झाल्यावर रेशन कार्डधारकाच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर मेसेज पाठविला जाईल.

घरबसल्या कसे लिंक करावे
स्टेप 1: सर्व प्रथम, युनिक आयडेंटिफिकेशन ऑफ इंडिया अर्थात uidai.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा.

स्टेप 2: त्यानंतर ‘स्टार्ट नाऊ’ पर्यायावर क्लिक करा.

स्टेप 3: आपल्या एड्रेस डिटेल भरा.

स्टेप 4: येथे आपल्याला बरेच पर्याय दिसतील, त्यापैकी तुम्हाला रेशन कार्ड बेनिफिट निवडावे लागेल.

स्टेप 5: रेशन कार्ड नंबर, आधार नंबर, ई-मेल एड्रेस आणि मोबाइल नंबर येथे भरा.

स्टेप 6: आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल. ओटीपी भरा आणि त्यानंतर प्रक्रिया पूर्ण झाल्याचा मेसेज स्क्रीनवर येईल.

स्टेप 7: हे पोस्ट करा. आपल्या अर्जाची पडताळणी होईल आणि रेशन कार्ड आधारशी लिंक केले जाईल.

देशातील सध्याच्या 23.5 कोटी रेशनकार्डपैकी जवळपास 90 टक्के कार्ड रेशनकार्डधारक आधारशी जोडली गेली आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.