हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्व शहरांमध्ये टोमॅटोचे भाव आकाशाला भिडलेले आहेत. टोमॅटोचे भाव हे गेल्या काही आठवड्यांपासून सातत्याने वाढतच आहेत. बर्याच शहरांमध्ये किरकोळ टोमॅटोची किंमत ही प्रति किलो 60-70 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या हंगामात टोमॅटो खराब होण्याची शक्यता जास्त असल्याचे ग्राहकमंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले. पासवान म्हणाले की,’ कापणीचा वेळ न मिळाल्याने टोमॅटोचे दर जुलै ते सप्टेंबर या कालावधीत जास्त असतात. टोमॅटोच्या नाशवंत गुणवत्तेमुळे, त्याच्या किंमतीत अधिक चढउतार होते. ते म्हणाले की,’पुरवठा सुधारल्यानंतर या किंमती पुन्हा सामान्य होतील. एका महिन्यापूर्वी ते प्रति किलो प्रती 20 रुपयांनी विकले जात होते.
70-80 रुपये प्रति किलो भावाने विकला जात आहे टोमॅटो
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, चेन्नईव्यतिरिक्त इतर मेट्रो शहरांमध्ये टोमॅटोचे किरकोळ दर हे 60 रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत, एका महिन्यापूर्वी 20 रुपये प्रति किलोच्या तुलनेत काही ठिकाणी टोमॅटो 70-80 रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहेत.
या शहरांमध्ये आहे टोमॅटो 70 रुपये प्रतिकिलो
गुरूग्राम, गंगटोक, सिलीगुडी आणि रायपूरमध्ये टोमॅटो 70 रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे, तर गोरखपूर, कोटा आणि दिमापुरात प्रतिकिलो 80 रुपये भाव आहे. आकडेवारीनुसार उत्पादक राज्यांतही हैदराबादमधील किंमत मजबूत झाली असून ती प्रति किलो 37 रुपये झाली आहे तर चेन्नईमध्ये 40 रुपये किलो आणि बेंगळुरूमध्ये ते 46 रुपये किलो आहे.
देशात टोमॅटोचे उत्पादन वर्षाकाठी 1.97 दशलक्ष लाख टन आहे
उत्तर प्रदेश, राजस्थान, झारखंड, पंजाब, तामिळनाडू, केरळ, जम्मू-काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश हे देशातील टोमॅटोचे कमी उत्पादन करणारे राज्ये आहेत. ते टोमॅटोच्या पुरवठ्यासाठी जास्त उत्पादन करणार्या राज्यांवर अवलंबून असतात. सरकारी आकडेवारीनुसार, देशात दरवर्षी सुमारे 1.97 दशलक्ष टन टोमॅटोचे उत्पादन होते, तर सुमारे 1.15 दशलक्ष टनांचा वापर होतो.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.