विशेष प्रतिनिधी । पुणे
राजकारण हा बदमाशांचा शेवटचा अड्डा आहे अशा रूपकाची प्रसिद्ध इंग्रजी उक्ती आहे. शहाण्या माणसाने राजकारणात पडू नये असं म्हटलं जात असताना महाराष्ट्र विधानसभेचं चित्र मात्र वेगळाच विचार समोर घेऊन आलं आहे. पक्षांतर, फोडाफोडी, महाजनादेश, जनसंवाद, हल्लाबोल, आसूड अशा सर्व प्रकारच्या यात्रा पार पडल्यानंतर ४ ऑक्टोबर २०१९ या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी २०१९ च्या विधानसभेसाठी अर्ज भरणाऱ्यांची एकूण संख्या तब्बल साडेसात हजारांवर पोहचली आहे. शेवटच्या दिवशी राज्यात विविध मतदारसंघांमध्ये ३ हजार ७५४ उमेदवारांनी ५ हजार १६३ नामनिर्देशनपत्रे दाखल केली. आजपर्यंत एकूण ५ हजार ५३४ उमेदवारांनी ७ हजार ५८४ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.
नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघात सर्वाधिक १३५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यापाठोपाठ पुणे कॅन्टोनमेंट मतदारसंघात ८५ उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. सर्वात कमी नामनिर्देशनपत्रे मुंबईतील माहिम आणि शिवडी या मतदारसंघांमध्ये दाखल करण्यात झाली असून या मतदारसंघांमध्ये प्रत्येकी ४ उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. नंदुरबार जिल्ह्यात ४ मतदारसंघात एकूण ४४ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केली. तर, धुळे जिल्ह्यात ५ मतदारसंघात ७०, जळगाव जिल्ह्यात ११ मतदारसंघात १७५, बुलढाणा जिल्ह्यात ७ मतदारसंघात ९५, अकोला जिल्ह्यात ५ मतदारसंघात १०७, वाशिम जिल्ह्यात ३ मतदारसंघात ६३, अमरावती जिल्ह्यात ८ मतदारसंघात १७६, वर्धा जिल्ह्यात ४ मतदारसंघात ६४, नागपूर जिल्ह्यात १२ मतदारसंघात २५३ भंडारा जिल्ह्यात ३ मतदारसंघात ७०, गोंदीया जिल्ह्यात ४ मतदारसंघात ७६, गडचिरोली जिल्ह्यात ३ मतदारसंघात ४७, चंद्रपूर जिल्ह्यात ६ मतदारसंघात ११०, यवतमाळ जिल्ह्यात ७ मतदारसंघात १३६ अर्ज दाखल झाले आहेत.
नांदेड जिल्ह्यात ९ मतदारसंघात ४०२, हिंगोली जिल्ह्यात ३ मतदारसंघात ५८, परभणी जिल्ह्यात ४ मतदारसंघात ८८, जालना जिल्ह्यात ५ मतदारसंघात १५०, औरंगाबाद जिल्ह्यात ९ मतदारसंघात २४७, नाशिक जिल्ह्यात १५ मतदारसंघात २४३, पालघर जिल्ह्यात ६ मतदारसंघात ८०, ठाणे जिल्ह्यात १८ मतदारसंघात ३००, मुंबई उपनगर जिल्ह्यात २६ मतदारसंघात ३३५, मुंबई शहर जिल्ह्यात १० मतदारसंघात १०६, रायगड जिल्ह्यात ७ मतदारसंघात १३२ , पुणे जिल्ह्यात २१ मतदारसंघात ४४१ अहमदनगर जिल्ह्यात १२ मतदारसंघात २०३, बीड जिल्ह्यात ६ मतदारसंघात २३२ , लातूर जिल्ह्यात ६ मतदारसंघात १३५, उस्मानाबाद जिल्ह्यात ४ मतदारसंघात ९२, सोलापूर जिल्ह्यात ११ मतदारसंघात २७३, सातारा जिल्ह्यात ८ मतदारसंघात १२५, रत्नागिरी जिल्ह्यात ५ मतदारसंघात ४५, सिंधुदूर्ग जिल्ह्यात ३ मतदारसंघात ३२, कोल्हापूर जिल्ह्यात १० मतदारसंघात २०४, सांगली जिल्ह्यात ८ मतदारसंघात १२५ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केली आहेत.