पेठ तालुक्यात प्रवासी वाहतूक करणाऱ्या क्रुझरचा भीषण अपघात; 2 ठार तर 25 जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकच्या पेठ तालुक्यातील पळशी-चिखली मार्गावरील रस्त्यावर चिखली गावाजवळ एक भीषण अपघात (cruiser accident) झाला आहे. गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे प्रवासी वाहतूक करणाऱ्या क्रुझरचा अपघात (cruiser accident) झाला आहे. या भीषण अपघातात (cruiser accident) दोघांचा जागीच मृत्यू झाला तर 25 जण जखमी झाले आहेत. या अपघातातील (cruiser accident) जखमींपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कुठं घडला अपघात ?
पेठकडून चिखलीकडे प्रवासी वाहतूक करणारी क्रुझर चिखली गावानजीक एका उतारावर उलटल्याने हा भीषण अपघात (cruiser accident) झाला. या अपघातात रामदास गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला, तर 15 वर्षीय मुलाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या अपघाताप्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिवानसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जाडर, दिलीप रहेर, आहेर, ससाणे हे करत आहेत.

अपघातातील जखमींची नावे
लक्ष्मण रामजी ठोंबरे,वसंत तुकाराम चौधरी,रेखा गणपत करवंदे,मोहन रामा जांजर,वामन महादु गायकवाड,मोतीराम नवसु भोये,मुरलीधर नारायण दोडके, शिवराम रतन दरोडे,लक्ष्मण काशिनाथ पाडवी,लक्ष्मीबाई येवाजी पवार,जिजाबाई महादू गाडर,कुसुम गणपत बाम्हणे,साळुबाई किसन,मनी किसन मानभाव,पवना गणपत बाम्हणे,अंजनी तुळशीराम भुसारे,कमळीबाई हरी ढेपणे,जयराम काशीराम गाडर,पुंडलिक कृष्णा गाडर,देवाजी त्रंबक भवर,हरी काशीराम ठेवणे अशी या अपघातात (cruiser accident) जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. या जखमींमध्ये पाच लहान मुलांचा समावेश आहे.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती