शिवसेना फक्त एकच, दुसऱ्या गटाला शिवसेना मानत नाही; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा

Uddhav Thackeray Eknath Shinde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दोन विषय दिल्ली दरबारी आहेत. सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी 14 तारखेपासून सलग होणार आहे. निवडणूक आयोगाची सुनावणी पूर्ण झाली आहे. दोन्हीकडून दावे, वाद, प्रतिवाद झाला आहे. आयोगाने 30 तारखेला दोन्ही बाजूला लिखित आदेश देण्यास सांगितले आहे. शिवसेना एकच आहे. दुसरी शिवसेना मी मानत नाही. शिवसेना एक होती आणि एकच राहील. आम्ही आमचे मुद्दे मांडले आहेत. आयुक्तांसमोर मांडले आहेत. लेखी स्वरुपात दिले आहेत. केवळ निवडून आलेले लोक पक्ष बनवणार असतील तर उद्या उद्योगपती देखील पंतप्रधान होतील, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर टीका केली.

उद्धव ठाकरेंनी मातोश्री निवासस्थानी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे गटावर कडाडून टीका केली. यावेळी ते म्हणाले की, गेल्या सहा सात महिन्यांपासून लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण झाला आहे. शिवसेनेचं काय होणार? धनुष्यबाणाचं काय होणार? पक्षाच्या नावाचं काय होणार? शिवेसेनच्या पाठीत पोटात वार करून टेंभा मिरवणारे आहेत त्याचं काय होणार? असा लोकांमध्ये सवाल आहे. त्यामुळे हा संभ्रम दूर व्हावा म्हणूनच मी पत्रकार परिषद घेतली आहे.

सर्वोच्च न्यायालयात आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा प्रलंबित आहे. त्यावर आधी सुनावणी झाली पाहिजे. त्याचा निकाल आधी आला पाहिजे. त्यानंतरच निवडणूक आयोगाचा निकाल आला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाने आपला निर्णय देऊ नये.

कोंबडा आधी की अंडे हा मुद्दा या प्रकरणात आहे. 20 जूनला पक्षादेश मोडून जे पळून गेले. त्यातील कैलास पाटील आणि नितीश देशमुख हे परत आले. पळून गेलेल्या गद्दारांनी शिवसेनेवर दावा करावा हे नीचपणाचं आहे. विकृत आहे. अपात्रतेचा निकाल आधी लावावा. तो प्रश्न आधी आहे. नंतर जूनमध्ये गद्दार गट कोर्टात गेला. त्यानंतर त्यांनी शिवसेनेवर दावा केला होता. त्यामुळे आधी अपात्रतेचा निर्णय झाला पाहिजे. नंतरच पक्षाबाबतचा निर्णय झाला पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.