“तुमचा पहाटेचा प्रयोग यशस्वी झाला असता तर नवाब मलिक अन अनिल देशमुख…”; उद्धव ठाकरेंचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई यथील अधिवेशनात आज पुन्हा मुख्यमंत्री ठाकरेंनी सभागृहात भाषण केले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पावित्रा सभागृहात घेतला. यावेळी मुख्यमंत्री ठाकरेंनी पहाटेच्या शपथविधीचा आठवण करून दिली. आज भाजपवाले नवाब मलिक यांचा राजीनामा मागतात पण जर तुमचा पहाटेचा शपथविधी यशस्वी झाला असता तर नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसला असता ना? असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात आज तुफान भाषण केले. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवरून भाजपवर हल्लाबोल केलाय. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वाधिक भ्रष्टाचाराचा झाल्याचा आरोप केला जात आहे. मंत्री नवाब मलिक अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यांना जेलमध्ये टाकण्यात आले. केंद्र सरकारच्या मदतीने असे खाणेरडे राजकारण विरोधक व भाजप नेत्यांकडून केले आहे.

आज भाजपवाले नवाब मलिक यांचा राजीनामा मागतात. आम्ही दाऊदची माणसं, भ्रष्टाचारी असं म्हणता. पण जर तुमचा पहाटेचा शपथविधी यशस्वी झाला असता तर नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसला असता ना? असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.