पाठीवर कौतुकाची थाप मारली, थापा मारल्या नाहीत; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वांद्रे येथील लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंती महोत्सव सोहळ्यास उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज ठाकरे यांच्यावर निशाणा सोहळा. यावेळी त्यांनी शिवशक्ती, भीमशक्ती आणि लहुशक्ती एकत्र येणार असल्याचे मोठे विधान केले. तसेच मी मुख्यमंत्री होतो पण, थापा कधी मारल्या नाही. पाठीवर कौतुकाची थाप मारली, पण, अशा थापा मारल्या नाहीत, असा टोला त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लगावला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवशक्ती, भीमशक्ती आणि लहुशक्ती ही एकाच शक्तीची रूप आहेत. या तिन्ही शक्ती एकवटल्या तर किती प्रचंड मोठी ताकद महाराष्ट्रात नाही तर देशात होईल. मुंबईमध्ये तुमची संख्या अडीच तीन लाख असेल. संख्या किती महत्त्वाची हे निवडणुकीच्या वेळेला कळते. मुंबई आपली राजधानी आहे. लहुजी साळवे, अण्णाभाऊ साठे यांचा आपण जयजयकार करतो. अण्णाभाऊ संयुक्त महाराष्ट्रासाठी संघर्ष केला. त्यांनी मिळवून दिलेली मुंबई आपल्या ताब्यात ठेवायची आहे.

मी गेल्या शनिवारी बुलडाण्याला जाऊन आलो. प्रत्येकवेळी भुलथापा मारायच्या सगळ्यांना संमोहित करायचं. हे पाप आपण कधी केलं नाही. आता मी बाहेर पडायला लागलो. गेल्या दोन-अडीच वर्षांचा कालखंड तुम्हाला माहीत आहे. आधी कोविडमध्ये गेले. नंतर काही दिवस हे आजारपणात गेले. घरी होतो तेव्हा घराबाहेर केव्हा पडणार. आता घराबाहेर पडायला लागलो तर यांच्या पोटात गोळा आला आहे, असल्याचे म्हणत ठाकरेंनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली.