मला खोटं पाडल्याबद्दल फडणवीसांचं आभार; उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना चोख प्रत्युत्तर

0
54
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | शिवसेनाप्रमुखांना मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर शिवसैनिक बसवेनच असं वचन दिलं होतं. आता ते वचन पाळण्याची जबाबदारी माझी आहे. देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांनी माझी भूमिका ऐकली होती आणि त्यावर त्या दोघांचं एकमत होत नव्हतं. स्वतःला पक्षात अडचण येऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीसांनी मलाच खोटं ठरवलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो पण मला त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती असंही ठाकरे पुढे म्हणाले. पद आणि जबाबदऱ्यांचं सम-समान वाटप हे ठरलं होतं, आणि आता हेच ते नाकारत असतील तर मी काय बोलणार असं म्हणत गोड बोलून आम्हाला नेहमी फरफटायला लावणाऱ्या भाजपचा खरा चेहरा आज उघडकीस आला असल्याची खंत उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवली.

केंद्रात नेहमीच अवजड उद्योग खातं दिलं तरी आम्ही ते स्वीकारलं, नितीशकुमारांनी साथ सोडली तरी मी सोडली नाही. आता मात्र आम्हाला स्वाभिमान दाखवावा लागेल असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या मनमानी कारभाराचे वाभाडे काढले. राज ठाकरेंच्या लाव रे तो व्हिडियो प्रमाणे उद्धव ठाकरेंनी भाजपच्या एकूण कारभाराचा समाचार घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here