नवी दिल्ली । दारूवर कृषी अधिभार लावण्याचा निर्णय घेतण्यात आला आहे. आजच्या केंद्रीय अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी याबाबत घोषणा केली आहे. यामुळे अर्थसंल्पानंतर मद्यपींना झटका बसला आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आर्थिक वर्ष २०२१-२२ चा अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर केला. यावेळी कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधा आणि विकास करण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील अधिभार वाढवण्याची घोषणा केली आहे.
पेट्रोलवर अडीच रुपये, तर डिझेलवर चार रुपये कृषी अधिभार आकारला जाणार आहे. परंतु, या वाढीचा ग्राहकांवर परिणाम होणार नसल्याचंही सरकारकडून यावेळी स्पष्ट करण्यात आलं आहे.