हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलीवूड अभिनेत्री उर्फी जावेद (Uorfi Javed) आपल्या अतरंगी कपड्यांमुळे कायमच चर्चेत असते. तिच्या या हटके स्टाईलमुळे अनेकदा ती टीकाकारांचे लक्ष्य बनते. सध्या भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी मधील वादही चव्हाट्यावर आला आहे. प्रकरणी उर्फीची शनिवारी पोलीस चौकशी करण्यात आली. चौकशी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी उर्फीने नवीने व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत चित्रा वाघ यांना डिवचले आहे.
https://www.instagram.com/reel/CnbG6RFB03e/?utm_source=ig_web_copy_link
तोकड्या कपड्यांवरुन वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या उर्फी जावेद हिने पोलीस चौकशीनंतर नवीन फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. सध्या उर्फीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. तिच्या फोटो आणि व्हिडिओवर अनेकांच्या लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. दरम्यान उर्फीच्या फॅशनला काहींचा कडाडून विरोध आहे.
https://www.instagram.com/reel/CnWNltLB7Ij/?utm_source=ig_web_copy_link
चौकशीवेळी काय म्हणाले उर्फी?
शनिवारी पोलीस चौकशीला सामोरे जात उर्फी म्हणाली, ‘मी स्वतंत्र नागरिक आहे. मला वेग-वेगळे कपडे घालायला मला प्रचंड आवडतात आणि संविधानामध्ये हा अपराध नाही. जेव्हा शूटसाठी बाहेर जाते तेव्हा पापाराझी माझे फोटो आणि व्हिडीओ बनवतात आणि ते व्हायरल होतात. यामध्ये माझी कोणतीही भूमिका नाही, असे उर्फीने म्हंटले आहे.