शवविच्छेदनात उघडकीस आले,जॉर्ज फ्लॉइडला झाली होती कोरोनाव्हायरसची लागण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पोलिसांच्या क्रौर्यामुळे ४६ वर्षीय जॉर्ज फ्लॉइडच्या झालेल्या मृत्यूमुळे अमेरिकेत २५ मेपासून हिंसक आंदोलनं सुरू आहेत. आता फ्लॉइडचा अधिकृत शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. जॉर्ज फ्लॉइडला कोरोनो विषाणूची लागण झाल्याचे या अहवालात स्पष्ट झाले आहे. हेनेपिन काउंटी वैद्यकीय परीक्षकांच्या अहवालात असे म्हटले आहे की, फ्लॉइडने मृत्यूच्या दोन महिन्यांपूर्वीच ३ एप्रिल रोजी या विषाणूची चाचणी केली होती जी सकारात्मक आली होती. या अहवालात असेही म्हटले आहे की गळ्यावर पडलेल्या दबावामुळे फ्लॉइड याचा मृत्यू झाला आहे.

एका गोऱ्या पोलिस अधिकाऱ्याने मागील सोमवारी जॉर्ज फ्लॉईडला अटक केली आणि त्याला अटक करतेवेळी वेळी या अधिकाऱ्याने त्याच्या गळ्यावर गुडघा ठेवला. फ्लॉइडच्या गळ्यावर तशाच स्थितीत सात मिनिटांपेक्षा जास्त काळ गुडघा ठेवल्याने त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान फ्लॉइडच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सुमारे ६०,००० लोकांसह शांततापूर्ण मोर्चा काढला होता. अमेरिकेतील टेक्सास प्रांतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या ह्यूस्टन शहरातील मोर्चात हॉलिवूड मधील गायकांपासून ते राजकारण्यांपर्यंत अनेक क्षेत्रातील लोक उपस्थित होते. यावेळी जमावाने ‘हात उचला, गोळी मारू नका’ आणि ‘न्याय नाही, शांतता नाही’ अशा घोषणा दिल्या. त्यांनी कडक उन्हात डिस्कवरी ग्रीन पार्क ते सिटी हॉल पर्यंत सुमारे एक मैल मार्च केला. या गर्दीत फ्लॉयडच्या कुटुंबातील एकूण १६ सदस्यांचा समावेश होता.

या रॅलीत फ्लॉयडच्या कुटुंबीयांनी समर्थकांचे त्यांनी दिलेल्या समर्थनाबद्दल कौतुक केले आणि त्यांना हिंसक होऊ नये म्हणून सांगितले. या मोर्चात महापौर सीलवेस्टर टर्नर, कॉंग्रेसच्या शीला जॅक्सन ली, लिझी फ्लेचर आणि सिल्व्हिया गार्सिया, आणि कॉंग्रेसमन अल ग्रीन यांच्यासह अनेक शहरी नेते तसेच अधिकारीही सहभागी झाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.