अमेरिकेत अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी हिंदू संघटनांनी सुरु केला हेल्पलाईन क्रमांक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेतील हिंदू संघटनांच्या गटाने कोरोना विषाणूच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर देशात अडकलेल्या हजारो भारतीय विद्यार्थ्यांसाठी एक हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. यातील बरच असे विद्यार्थी आहेत ज्यांच्याकडे राहण्याची सोयदेखील नाही आहे. हिंदु युवा, भारतीय, विवेकानंद हाऊस आणि सेवा इंटरनॅशनल यांनी संयुक्तपणे ‘कोविड -१९ स्टुडंट सपोर्ट नेटवर्क’ हेल्पलाईन 802-750-YUVA (9882) सुरू केली आहे.

वॉशिंग्टन डीसीच्या स्थानिक आयोजकांपैकी एक प्रेम रंगवानी यांनी सांगितले की हे ९० विद्यार्थ्यांनी चालविले आहे. ही हेल्पलाईन आवश्यक असणाऱ्या वस्तू आणि गृहनिर्माण सेवा पुरवण्या व्यतिरिक्त विविध ठिकाणी अडकलेल्या विद्यार्थ्यांना मदत करेल.अनेक तज्ञ आणि व्यावसायिक स्वयंसेवकही या हेल्पलाइनशी जोडलेले आहेत.हे लोक भारतीय विद्यार्थ्यांना कायमचे वास्तव्य करण्यासाठी परदेशात येणे संबंधित मुद्द्यांविषयी सल्ला देतील आणि आवश्यक असल्यास मानसिक आरोग्यासाठीदेखील संसाधने देतील.

अमेरिका में फंसे भारतीय छात्रों के लिए हिंदू संगठनों ने हेल्पलाइन नंबर जारी किया- India TV

ते म्हणाले की अमेरिकेतील विविध विद्यापीठांत सुमारे अडीच हजार भारतीय विद्यार्थी अभ्यास करतात आणि जवळपास सर्वच विद्यालये बंद आहेत. विद्यार्थ्यांना वसतिगृहहे ही सोडण्यास सांगितले आहे.

काही विद्यापीठांनी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी राहण्याची विशेष तरतूद केली आहे, परंतु सर्वच विद्यापीठांनी तसे केलेले नाही आणि अजूनही बऱ्याच विद्यार्थ्यांना राहण्याची सोय मिळाली नाही. रंगवानी म्हणाले की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी हा सामुदायिक पातळीवर केलेला प्रयत्न आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment