औरंगाबाद शहरात ३७ केंद्रांवर महापालिकेकडून लसीकरण अभियान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | राज्य सरकारच्या निर्देशानुसार ४५ वर्षे व त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना एक एप्रिलपासून कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जाणार आहे. या लसीकरण अभियानाची तयारी महापालिकेने केली असून शहरात ३७ केंद्रे यासाठी तयार केले जाणार आहेत. लस घेण्यासाठी येताना नागरिकांना मतदान कार्ड, आधार कार्ड किंवा पॅनकार्ड या पैकी एक पुरावा सादर करावा लागणार आहे.

कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरणाची मोहीम १६ जानेवारीपासून सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात डॉक्टर्स व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर्सला लस देण्यात आली. तिसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व विविध व्याधींनी त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी लसीकरण करण्यात आले. आतापर्यंत सुमारे ८५ हजार नागरिकांना लस देण्यात आली आहे.

सरकारने आता १ एप्रिलपासून ४५ वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना सरसकट लस देण्याचे जाहीर केले आहे. या निर्देशानुसार महापालिकेने लसीकरणाची तयारी सुरू केली आहे.

शहरात लसीकरणाची ठिकाणे खालीलप्रमाणे…

धूत हॉस्पिटल, एमजीएम हॉस्पिटल, युनायटेड सिग्मा हॉस्पिटल, डॉ. हेडगेवार रुग्णालय, कमलनयन बजाज हॉस्पिटल, एमआयटी हॉस्पिटल, मेडिकोव्हर हॉस्पिटल, अल्पाइन हॉस्पिटल, दहिबळे हॉस्पिटल, जे. जे. हॉस्पिटल, लायन्स आय हॉस्पिटल, निमाई हॉस्पिटल, लाइफलाइन हॉस्पिटल, उत्कर्ष हॉस्पिटल, माणिक हॉस्पिटल, सेन्च्युरी हॉस्पिटल, कृपामई हॉस्पिटल, इंटरनॅशनल हॉस्पिटल, एन ११, एन ८ महापालिका आरोग्य केंद्र, ईएसआयसी हॉस्पिटल, घाटी रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, सादात नगर आरोग्य केंद्र, छावणी परिषदेचे आरोग्य केंद्र, बन्सीलालनगर आरोग्य केंद्र, राजनगर आरोग्य केंद्र, शिवाजीनगर आरोग्य केंद्र, बायजीपुरा आरोग्य केंद्र, आरेफ कॉलनी आरोग्य केंद्र, सिल्कमिल्क कॉलनी आरोग्य केंद्र, शहाबाजार आरोग्य केंद्र, कैसर कॉलनी आरोग्य केंद्र, विजय नगर आरोग्य केंद्र, एमआयटी कॉलेज सातारा परिसर आदी केंद्रांवर लसीकरणाची सुविधा करण्यात आली आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

 

Leave a Comment