वंदे भारत ट्रेन भारताच्या विकासाच्या वेगाचं प्रतीक : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Vande Bharat train (1)
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्राला या दोन ट्रेनमुळे चांगला फायदा होणार आहे. आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. आज रेल्वे क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे. देशात आतापर्यत 10 वंदे भारत ट्रेन सुरु झाल्या आहेत. त्यामध्ये या दोन ट्रेनची भर पडली आहे. वास्तविक वंदे भारत ट्रेन भारताच्या विकासाच्या वेगाचं प्रतीक आहे. वंदे भारत ट्रेन हे आजच्या आधुनिक भारताचे एक भव्य चित्र आहे. हे भारताच्या गती आणि प्रमाणाचे प्रतिबिंब आहे. या दोन ट्रेनच्या माध्यमातून महाराष्ट्र, मुंबईच्या प्रयत्न विकासाला चालना मिळणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वाच्या 2 वंदे भरत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण केला. यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी नरेंद्र मोदी यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. वंदे भारत ट्रेनला समर्पित करताना मला अत्यंत आनंद होत आहे. रेल्वे क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे. देशातील नववी आणि दहावी ट्रेन सुरू झाली आहे. आर्थिक राजधान्यांना या दोन ट्रेन जोडल्या जाणार आहेत. मोठ्या गतीने देशात वंदे भारत ट्रेन सुरू झाल्या. देशातील 17 राज्यातील 108 जिल्ह्यात वंदे भारत ट्रेनने जोडले आहेत.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रात सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. महाराष्ट्रला 13 हजार 500 करोड रेल्वेसाठी मिळाले हे पहिल्यांदा घडले आहे. हे सामान्य लोकांचे सरकार आहे. हे फक्त केंद्राच्या पाठिंब्यामुळे शक्य झाले, असेक शिंदे यांनी म्हंटले.

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नुकतेच मुंबईतून दोन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरून एक गाडी साई नगर शिर्डी आणि दुसरी सोलापूरला रवाना झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही आहे.