वरुण धवन-नताशा दलाल या महिन्यात अडकणार लग्नबंधनात. अलिबागमध्ये केले हॉटेल बुक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । सध्या वरुण धवन आणि नताशा दलालच्या लग्ना संबंधित एक मोठी बातमी समोर येते आहे. या महिन्याच्या अखेरीस हे दोघेही लग्नगाठ बांधणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. गेल्या वर्षी मे मध्ये वरुण-नताशाचे लग्न होणार होते, परंतु कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे ते पुढे ढकलले गेले. या लग्नासाठी अलिबागमधील हॉटेल बुक करण्यात आले आहे. लग्न पंजाबी पद्धतीचे असेल. पिंकविलाच्या अहवालानुसार साधारण 200 लोकं या लग्नाला हजेरी लावतील. वरुण धवन यासंदर्भात नुकताच अलिबागमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये पोहोचला होता. वरुण धवन आणि नताशा दलाल गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांनाही अनेक खास प्रसंगी एकत्र पाहिले गेले होते. या जोडप्याचे अनेक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

कॉफी विथ करण सीझन 6 मध्ये वरुण धवनने खुलासा केला की, तो नताशा दलाल हिला डेट करत आहे. आम्ही लवकरच लग्न करू असे सूतोवाचही त्याने यावेळी दिले होते. वरुण धवनने सांगितले होते की, शालेय जीवनापासूनच नताशा त्याला खूप साथ देत होती. अनेक चांगल्या तसेच प्रत्येक कठीण प्रसंगी देखील ती त्याच्याबरोबर होती. आपल्या कारकिर्दीच्या पहिल्या काही वर्षांमध्ये त्याने नताशाबरोबरच्या आपल्या नात्याला चर्चेत येऊ दिले नाही. परंतु, अनेक विशेष प्रसंगी या दोघांच्या एकत्रित उपस्थितीमुळे हे स्पष्ट झाले की दोघेही डेट करत आहेत.

वरुण धवनने नुकतेच फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत असे म्हटले आहे की, तो 2021 पर्यंत नताशाबरोबरच्या आपल्या नात्याला पुढे नेईल. वरुण म्हणाला की, गेली दोन वर्षे प्रत्येकजण माझ्या लग्नाबद्दल बोलत आहे, पण अद्याप काहीही निश्चित झाले नाही, जगभरात अजूनही संभ्रमाची परिस्थिती आहे. यावर्षी परिस्थिती सुधारेल तेव्हा आपण लग्न करू शकू .

नताशाने फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात पदवी मिळविली आहे. 2013 साली नताशाने फॅशन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी न्यूयॉर्कमधून आपले शिक्षण पूर्ण केले. शिक्षण घेतल्यानंतर नताशाने स्वतः डिझायनिंग क्षेत्रात काम करण्यास सुरवात केली आणि आज ती या उद्योगातील एक नावाजलेलं नाव आहे. तिच्या कपड्यांचा ब्रँडदेखील आहे, जो बॉलिवूडच्या टॉप स्टार्सच्या पसंतीचा आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.