वसंत मोरेंना मनसेच्या पुणे शहराध्यक्ष पदावरून हटवले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसेचे पुण्याचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांना शहराध्यक्ष पदावरून हटवण्यात आले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यावरून केलेल्या वक्तव्या वरून वसंत मोरे यांनी नाराजी दर्शवली होती. त्यानंतर मनसेत वेगवान घडामोडी घडत वसंत मोरे यांना शहराध्यक्ष पदावरून हटवले आहे.

राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थावर आज मनसे नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी वसंत मोरे यांच्या जागी साईनाथ बाबर यांची शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी भोंग्याबाबत दिलेल्या आदेशाला विरोध केल्याचे वसंत मोरे यांना महागात पडले आहे. यापूर्वी वसंत मोरे हे मनसे पदाधिकाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या व्हॉटसअ‍ॅप ग्रुपमधून वसंत मोरे बाहेर पडल्याचे माहीत समोर आली होती.

https://www.facebook.com/407529622782440/posts/2056614637873922/

वसंत मोरेंची काय होती भूमिका-

वसंत मोरे यांनी मी माझ्या प्रभागातील मशिदींसमोर भोंगे लावणार नाही, अशी भूमिका घेतली होती. मनसेच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांच्या भाषणाचा मतितार्थच समजलेला नाही. सध्या रमजानचा महिना सुरु आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी शांत राहिले पाहिजे. मी माझ्या प्रभागात तरी मशिदींसमोर भोंगे लावणार नाही, अशी भूमिका वसंत मोरे यांनी घेतली होती.

Leave a Comment