मुंबई । मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आज विधानसभा अधिवेशनावेळी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी हिरेन देशमुख प्रकरणावरून राज्य सरकारला धारेवर धरले. फडणवीस यांनी हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांचा जबाब वाचून दाखवला. यावेळी हिरेन यांची हत्या गाडीतच करण्यात आल्याचा आम्हाला संशय आहे, असा दावा फडणवीस यांनी केला.
मनसुख हिरेन यांची पत्नी विमला हिरेन यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे कि माझ्या पतीची चौकशी वाझे यांनीच केली होती. हिरेन तीन दिवस वाझेंकडेच होते. तसेच हिरेन यांची गाडीही चार महिने वाझेंकडेची होती. त्यामुळे वाझेंना 201 कलमाखाली अटक का झाली नाही? वाझे यांना कोण वाचवतंय? असा सवाल फडणवीस यांनी विधानसभेत व्यक्त केला आहे.
फडणवीस नक्की काय म्हणाले?
मी जबाब वाचून दाखवतो. वरील एकंदर परिस्थितीवरुन, माझ्या पतीचा खून झाला असावा अशी माझी खात्री आहे. हा खून सचिन वाझेंनी केला असावा असा माझा संशय आहे. म्हणून सदर घटनेबाबत सखोल चौकशी व्हावी. यामध्ये अजून दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली म्हणजे २०१७ चा एफआयआर आहे. यानुसार दोन लोकांनी ४० लाखांची खंडणी मागितल्याचा एफआयआर आहे. यामध्ये दोन लोकांनी अटकपूर्व जामीन घेतला. यातील एकाचं नाव आहे धनंजय विठ्ठल गावडे आणि दुसरा सचिन हिंदुराव वझे.
हा जो मनसुख हिरेन आहे. यांचं शेवटचं लोकेशन आहे ते धनंजय विठ्ठल गावडे यांच्या ठिकाणी आहे. 40 किमीवर बॉडी सापडते. गावडेच्या ठिकाणी जाण्याचे कारण काय? काहीच नाही. गावडेच्या ठिकाणापासून ४० किमीवर हिरेन यांची बॉडी सापडली. त्यामुळे हे स्पष्ट आहे, यापेक्षा अधिक पुरावे काय हवेत?
अध्यक्ष महोदय, 201 खाली सचिन वाझेंना अटक का झाली नाही? ३०२ चं सोडून द्या. मला राजकारण नको. ते कोणत्या पक्षाचे आहेत याच्याशी देणंघेणं नाही. कोण वाचवतंय, आणि कशासाठी वाचवतंय. आम्हाला संशय आहे, मनसुख हिरेन यांची हत्या गाडीमध्ये करण्यात आली. गावडेंच्या एरियात करण्यात आली आणि त्यानंतर त्यांची बॉडी खाडीत फेकण्यात आली. यांची चूक कुठे झाली, यांना वाटलं हाय टाईड आहे. बॉडी परत आली नसते, लो टाईड होती, म्हणून परत आली. 302 च होत राहिल. तात्काळ सचिन वाझेंना अटक झाली पाहिजे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.