हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई येथे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते देवेंद्र फडणवीस ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरुन राज्य सरकारवर टीका केली. त्यांच्या टीकेला मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “विरोधी पक्ष नेत्यांचे आभार मानले पाहिजे, त्यांनी मला वस्तू स्थिती सांगण्याची संधी दिली. भाजपच्या काळात महाज्योती फक्त कागदावर होती, ते आम्ही प्रत्येक्षात उतरवले. मंत्रिपद नंतरचा प्रश्न आहे आमच्यासाठी ओबीसी आरक्षण महत्वाचे आहे,” असे मंत्री वडेट्टीवार यांनी म्हंटले.
मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकावर अनेक आरोप केले आहरेत. त्यांनी महाज्योतीवरून टीका केली आहे. याबाबत सांगायचे झाले तर विरोधी पक्ष नेत्यांचे आभार मानले पाहिजे, त्यांनी मला वस्तू स्थिती सांगण्याची संधी दिली. ओबीसीमध्ये आम्ही जन्म घेतला, आम्ही महाज्योती बंद पडू देणार नाही. मंत्री पद नंतरचा प्रश्न आहे, ओबीसी आरक्षण महत्वाचं आहे.
वास्तविक पाहता भाजपच्या काळात महाज्योती फक्त कागदावर होती, आम्ही प्रत्येक्षात उतरवले. आम्ही अनेक विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी पाठवले. महाज्योतीच्या माध्यमातून वेगवेगळ्या सुविधा आम्ही निर्माण करत आहोत, असे मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले.
काय केली फडणवीसांनी टीका?
देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकावर टीका करताना म्हणाले की, मराठा-ओबीसी आरक्षण हे दोन्ही मोठे विषय, खरं म्हणजे छत्रपतींच्या घराण्यातील व्यक्तीला उपोषणाला बसावं लागणं हे वाईट, आताही सरकार ते आश्वासन पूर्ण करेल याबाबत सांगता येत नाही. आधी सुरु असलेल्या योजनाही बंद केल्या. महाज्योती बंद पाडण्याचं काम सरकारने केले आहे. ओबीसींवर सरकारचा इतका राग का आहे, हा प्रश्न पडतो. ओबीसी मोर्चा काढतात, त्यांच्या दिव्याखाली अंधार आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.