वडेट्टीवारांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन समाजावरचे प्रेम दाखवावे; निलेश राणेंचं खुलं आव्हान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मी ओबीसी असल्यामुळे मला महसूल खाते मिळालं नाही अशी खंत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केल्यानंतर महाविकास आघाडीतील समन्वय चव्हाट्यावर आला आहे. याच पार्श्वभूमीवर वडेट्टीवार यांच्या या विधानाचा आधार घेऊन भाजप नेते निलेश राणे यांनी महाविकास आघाडीवर टीका करत वडेट्टीवार याना खुल आव्हान दिले आहे.

निलेश राणे यांनी ट्विट करत म्हंटल की, महसूल खातं मिळालं नाही ही खंत असेल वडेट्टीवारांची तर महाविकास आघाडी ओबीसी समाजाच्या विरोधात आहे असा अर्थ होतो. पण तरीसुद्धा तुम्ही मंत्री म्हणून त्या मंत्रिमंडळात का चिटकले आहात? राजीनामा देऊन तुम्ही खरचं समाजावर प्रेम करता हे दाखवून द्या’.

वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?

मी विरोधी पक्षनेता होतो. ओबीसींचं नेतृत्व करतो. मला वाटलं महसूल खातं मिळेल, पण हे खातं भेटले. कारण मी ओबीसी आहे ना असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी आपली खंत व्यक्त केली. ओबीसी नसतो, तर याहून अधिक तालेवार खाते मिळाले असते. कदाचीत ओबीसी असल्यामुळे मदत व पुनर्वसन खाते मिळाले, असे विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत

You might also like