हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील सभेत हिंदुत्वाचा नारा देत भाजपच्या नेत्यांची स्तुती केली. तर शिवसेनेवर टीका केली. यावरून शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. “गुढीपाडव्याला राज ठाकरे यांचे जे भाषण झाले ते पूर्णपणे आघाडी सरकारचे लक्तरे काढणारे होते. महाराष्ट्राची खरी शोकांतिका हि लग्न एका सोबत केले आणि संसार दुसऱ्या सोबत केले हि आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही,” अशी टीका विनायक मेटे यांनी केली.
विनायक मेटे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, नुकताच मनसेचा गुडीपाडवा मेळावा पार पडला. या मेळाव्याच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी शिवसेनेवर टीका केली. राज ठाकरे बोलले ते खरच आहे. महाराष्ट्राची खरी शोकांतिका त्यांनी मांडली आहे. राज ठाकरे यांनी कोणासोबत पळून जातात आणि लग्न दुसऱ्या सोबत असे म्हंटले.
गुढी पाडव्या निमित्त शिवाजी पार्कवर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज ठाकरे यांनी आघाडी सरकारवरही घणाघाती टीका केली होती. शिवसेनेने भाजपसोबत युती केली. निवडणुका लढवल्या आणि निकालानंतर आपलं सरकार येत नाही हे लक्षात आल्यावर त्यांना मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला आठवला. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती केली.अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती.