हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कधीकधी अशी प्रकरणे समोर येतात ज्यावर विश्वास ठेवणे फार कठीण होते. अशीच एक घटना फ्रान्समध्ये समोर आली आहे जिथे एका माणसाने माशी मारण्याच्या प्रक्रियेत आपले घरच जाळले. हा माणूस माशीच्या गुणगुणण्याच्या आवाजाने इतका अस्वस्थ झाला होता आणि तिला मारण्यासाठी इलेक्ट्रॉनिक रॅकेटचा वापर करत होता.
AFP च्या म्हणण्यानुसार, फ्रान्समधील डोर्डनमध्ये राहणारे सुमारे 80 वर्षाचे वृद्ध रात्रीचे जेवण करीत होते, परंतु एका माशीच्या गुणगुणण्याच्या आवाजाने ते अस्वस्थ होऊ लागले. अशातच त्यांनी कीटकांना मारण्यासाठी वापरणारे इलेक्ट्रॉनिक रॅकेट उचलले आणि माशीला मारण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी त्यांच्या घरात गॅस लीक होत होता आणि इलेक्ट्रॉनिक रॅकेटचा हवेतच स्फोट झाला. या स्फोटात त्यांचे किचन आणि घराच्या छताचे बरेच नुकसान झाले आहे. स्थानिक माध्यमांच्या म्हणण्यानुसार, ते नशिबवान आहेत की झालेल्या स्फोटातून वाचले, परंतु त्यांचा हात किंचितच जळाला आहे. ते सध्या एका छावणीत राहत आहे आणि त्याचे कुटुंब घर दुरुस्त करत आहे.
Man blows up part of his house in France while trying to swat a flyhttps://t.co/mw1YAWU8mI
— BBC News (World) (@BBCWorld) September 6, 2020
ती व्यक्ती मृत्यूचे लाईव्ह स्ट्रीमिंग करीत होती
या माशीच्या घटनेच्या आदल्याच दिवशी शनिवारी सकाळपासून फ्रान्समधील एका व्यक्तीने आपल्या मृत्यूचे लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू केले. मात्र, नंतर फेसबुकने त्या व्यक्तीचे अकाउंट ब्लॉक केले. वास्तविक, या व्यक्तीस अनेक प्रकारचे आजार आहेत. या व्यक्तीने राष्ट्रपति इमॅन्युएल मॅक्रॉन यांना इच्छामरण मंजूर करण्याचे आवाहन केले. कायदा नसल्यामुळे जे मॅक्रोने ते नाकारले.
एका वृत्तानुसार 57 वर्षांचे एलीन कोक हे गेल्या 34 वर्षांपासून अनेक असाध्य आजारांनी ग्रस्त आहे. त्यानंतर त्यांनी मॅक्रो यांना पत्र लिहून इच्छामरण देण्याची मंजूरी मागितली. राष्ट्रपतींनी त्यांना उत्तर देताना सांगितले की, फ्रेंच कायद्यात याची परवानगी नाही. यामुळे कंटाळलेल्या एलीन कोकने शनिवारीपासून आपल्या मृत्यूचे लाईव्ह स्ट्रीमिंग करण्याचे जाहीर केले. पूर्व फ्रान्समधील डेजॉन येथील घरातून शुक्रवारी रात्री एलीन कोक यांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये, मी माझे शेवटचे भोजन खाल्ल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, ते आपल्या मृत्यूचे लाईव्ह स्ट्रीमिंग करत आहेत कारण यामुळे इच्छामरण कायद्याकडे लोकांचे लक्ष आकर्षित होईल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”