VISA आणि Mastercard म्हणाले,”पोर्नहबबरोबरील व्यवसायिक संबंधांची तपासणी करणार”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । दिग्गज क्रेडिट कार्ड कंपन्या व्हिसा आणि मास्टरकार्डने म्हटले आहे की, ते पॉर्नहबशी असलेल्या त्यांच्या व्यवसाय संबंधांची चौकशी करतील. एका वृत्तपत्राच्या नावाजलेल्या स्तंभलेखकाने असा आरोप केला आहे की, अश्लील व्हिडिओ प्रसारित करणारी ही वेबसाइट बलात्कारासह अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवते, त्यानंतर या कंपन्यांचे हे विधान पुढे आले आहे.

‘द न्यूयॉर्क टाइम्स’ स्तंभलेखक निकोलस क्रिस्टॉफ यांनी शुक्रवारी लिहिले की, पॉर्नहब वेबसाइटमध्ये बलात्काराचे दृश्य, सूडबुद्धीचे अश्लील व्हिडिओ आणि लोकांच्या परवानगीशिवाय तयार केलेले व्हिडिओ दर्शविले गेले आहेत. पॉर्नहबने अद्याप या आरोपांवर आपली प्रतिक्रिया दिलेली नाही.

https://wp.me/p9voxs-mWE

पेपलने त्यांची सर्व्हिस थांबविली
ऑनलाइन पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर ‘पेपल’ (Paypal) ने मागील वर्षी पॉर्नहबसाठीची आपली सर्व्हिस थांबविली होती. पॉर्नहब ‘माइंडगीक’ च्या मालकीची आहे. या वेबसाइटवर कार्यरत असलेल्या इतर क्रेडिट कार्ड कंपन्यांनीही पॉर्नहबबरोबर काम करणे थांबवावे असे आवाहन या स्तंभलेखकाने केले आहे.

ख्रिस्तोफच्या स्तंभावर प्रतिक्रिया व्यक्त करताना व्हिसा आणि मास्टरकार्ड ने रविवारी सांगितले की, ते या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

https://wp.me/p9voxs-mWo

वित्तीय संस्थांकडून मालकी असलेल्या कंपनीशी चर्चा
व्हिसा याबाबत म्हणाले, “आम्हाला या आरोपांची माहिती आहे आणि त्वरित चौकशीसाठी आम्ही संबंधित वित्तीय संस्थांशी चर्चा करीत आहोत. या व्यतिरिक्त आम्ही या वेबसाइटच्या मालकीच्या कंपनीशी थेट बोलणी करणार आहोत. ”

ते म्हणाले की, या वेबसाइटवरचे आरोप खरे असल्याचे सिद्ध झाल्यास या वेबसाइटला व्हिसाद्वारे पेमेंट्स स्वीकारण्यास बंदी घातली जाईल. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचेही मास्टरकार्डने सांगितले.

https://wp.me/p9voxs-mWM

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment