मुंबई | लॉकडाऊननंतर मोबाईलवरील ओटीटी प्लॅटफॉर्मला खूप मागणी आली. यामध्ये ऑनलाईन मनोरंजन काँटेंटची मागणी खूप वाढली. यासोबत अश्लील काँटेंटची मागणीही तितकीच वाढली. नुकतीच मुंबई गुन्हे शाखेने अश्या प्रकारे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या एका टोळीला अटक केली आहे. हिरोसहित इतर आठ लोकांना अटक केली असून व्हिडिओमध्ये काम करणाऱ्या तरुणीची सुधारणा गृहात रवानगी करण्यात आली आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, एक टोळी अश्या प्रकारे व्हिडिओ रेकॉर्ड करून त्याला ओटीटी प्लॅटफॉर्मवरील एका ॲपमध्ये आठवडा भरासाठी टाकत असे. यानंतर नवीन अठवड्यासाठी नवीन भाग शूट केला जात असे. या ॲपचे लाखो सबस्क्राईबर असून महिन्याला 199 रुपये ते चार्ज करत होते. अश्या प्रकारे, टीम मधील सदस्य कोट्यावधी रुपये कमवत होते.
अटक केल्यानंतर त्यांच्याकडून मोबाईल कॅमेरा, स्क्रिप्ट आणि इतर साहित्य जप्त केले आहे. अटक केलेल्या लोकांनी हे पॉर्न नसून, लव्ह स्टोरी शूटिंग करत असल्याचे सांगितले. ओटीटी प्लॅटफॉर्मवर सरकारचा यापूर्वी कोणताही वचक नव्हता. आता यापुढे सरकारने ओटीटी प्लॅटफॉर्मला नियम बसवले आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.