परभणी प्रतिनिधी | चित्रा वाघ यांना आम्हीच हाकलून देणार होतो बर झाल त्याच पक्ष सोडून निघून गेल्या अशी तिखट प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्या फौजिया खान यांनी दिली आहे. चित्रा वाघ यांच्या राष्ट्रवादी सोडण्याने राजकीय वर्तुळाला चांगलच हादरा बसला आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांनीच एकाद्या पक्षाला असा धक्का दिल्याने ते सध्या चर्चेचा विषय बनल्या आहेत.
वर्ष भरापासून चित्रा वाघ पक्षाला नुकसान होईल अशा करवाह्या करत होत्या त्यामुळे पक्षच त्यांना हाकलून देण्याच्या विचारात होता असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीच्या नेत्या आणि माजी मंत्री फौजीया खान यांनी केला आहे. चित्रा वाघ यांच्या बद्दल प्रथमच राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्याने एवढी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. फौजिया खान यांनी दिलेल्या वक्तव्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे.
चित्रा वाघ या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार अशा बातम्या माध्यमात झळकत होत्या. मात्र त्यांनी काल शुक्रवारी रात्री माध्यमात आपल्या राष्ट्रवादीच्या प्रथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने त्यांचे भाजपमध्ये जाने निश्चित आहे याला दुजोरा मिळाला. सध्या त्यांनी आपली राजकीय भूमिका जाहीर केली नाही तरी त्या येत्या ३० तारखेला भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे.
म्हणून चित्रा वाघ यांनी सोडली राष्ट्रवादी ; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
विधानपरिषद निवडणूक अंबादास दानवे यांच्या नावाच्या आघाडीने अर्जुन खोतकरांच्या गोटात खळबळ
राजेंच्या भाजप प्रवेशाचा मंगळवारी मुहूर्त
महाराष्ट्राला २ मुख्यमंत्री दिलेले नाईक घराणे शिवसेनेत जाणार
दिलीप सोपलच भाजपमध्ये जाणार ; राजेंद्र राऊतांचे काय होणार?