पश्चिम बंगाल निवडणूक : प्रशांत किशोर यांचा ‘तो’ दावा ठरतोय खरा; भाजप 100 च्या आत तर ममता पराभवाच्या छायेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत भाजपला हादरा दिला आहे. तृणमूल काँग्रेस तब्बल 200 जागांवर विजयी होताना दिसत असून भाजपसाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, सध्याच्या कलांनुसार प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी ठरताना दिसताना आहे.

‘द इंडियन एक्स्प्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुकीसंदर्भात भाष्य केले. यावेळी त्यांनी आपण भाजपला बंगालमध्ये 100 जागा जिंकण्यासाठीही संघर्ष करावा लागेल, या मतावर अजूनही ठाम असल्याचे सांगितले. मात्र, भाजपने पश्चिम बंगालची निवडणूक जिंकली तर देशात भाजपचा एकाधिकारशाही निर्माण होईल, असा इशारा प्रशांत किशोर यांनी दिला होता.

बंगालमध्ये भाजपला १०० हून अधिक जागा मिळाल्यास मी निवडणूक रणनीतीकार म्हणून काम करणं बंद करेन आणि दुसरं काहीतरी काम सुरू करेन, असं किशोर म्हणाले होते. बंगालमध्ये भाजपनं १०० पेक्षा अधिक जागा जिंकल्यास तुम्ही मला दुसरं काहीतरी काम करताना बघाल. पण निवडणूक रणनीतीकार म्हणून काम करताना मी तुम्हाला कधीही दिसणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती.

हे पण वाचा –

 

 

You might also like