दिवाळीनंतर ‘या’ स्मार्टफोनमध्ये नाही चालणार WhatsApp, तुमच्या स्मार्टफोनचा तर समावेश नाही ना?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – WhatsApp हा सध्या अनेक लोकांच्या जीवनातील महत्वाचा भाग बनला आहे. या WhatsApp वर कौटुंबिक चर्चेपासून ते ऑफिसच्या कामांपर्यंत प्रत्येक संभाषणाची देवाणघेवाण होते. WhatsAppचे जगभरात 2 अब्ज सक्रिय युजर्स आहेत. एकट्या भारतात त्याचा आकडा 500 लाखांपेक्षा जास्त आहे. आता काही दिवसांवर दिवाळीचा सण येऊन ठेपला आहे. या निमित्त अनेकजण व्हॉट्सॲपवरून शुभेच्छा पाठवतील, व्हिडीओ कॉलकरून आपल्या प्रियजनांशी गप्पा मारतील, फोटो आणि व्हिडिओ शेअर करतील. मात्र दिवाळीपासून सर्वांनाच ही सुविधा मिळणार नाही. कारण iPhone आणि Android च्या काही जुन्या व्हर्जनवर WhatsApp काम करणार नाही.

या फोनवर वापरता येणार नाही WhatsApp
iOS 10 आणि iOS 11 वर चालणाऱ्या iPhones साठी WhatsApp आपला सपोर्ट काढून घेत आहे. यामुळे आता व्हॉट्सॲप या प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टीमसह आयफोनवर काम करणार नाही. यासोबतच iPhone 5 आणि iPhone 5C चे वापरकर्ते व्हॉट्सॲपच्या सेवेचा लाभ घेऊ शकणार नाही. iOS 12 आणि त्याच्या वरच्या ऑपरेटिंग सिस्टमवर WhatsApp सुरळीत चालेल. WhatsApp नेहमी आपल्या वापरकर्त्यांना नवीन व्हर्जन अपग्रेड करण्याचा सल्ला देते जेणेकरुन नवीन वैशिष्ट्ये उपलब्ध होऊ शकतील आणि हे ॲप स्मार्टफोनवर सुरळीतपणे चालू शकेल.

या अँड्रॉइड फोनवरून हटवण्यात येणार व्हॉट्सॲप
आयफोनप्रमाणेच काही अँड्रॉईड फोनवर व्हॉट्सॲप काम करणार नाही. कंपनीने म्हटले आहे की, 4.1 किंवा त्यापेक्षा जुन्या आवृत्तीवर चालणाऱ्या अँड्रॉईड फोनला व्हॉट्सॲप सेवेचा लाभ घेता येणार नाही. म्हणजे या फोनवरून मेसेज पाठवता येणार नाही कॉल किंवा व्हिडिओ कॉलही करता येणार नाही. यासाठी यूजरला त्याच्या फोनची ऑपरेटिंग सिस्टम अपडेट करावी लागणार आहे.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती