Coronavirus: WHO ने Pfizer लसीच्या तातडीच्या वापरास दिली मान्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (WHO) फायझर-बायोटेक (Pfizer-BioNTech) लसीच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे. WHO च्या मान्यतेनंतर आता जगातील अनेक देशांमध्ये या लसीच्या आयात आणि डिस्ट्रीब्यूशनला परवानगी दिली जाईल. या लसीच्या वापरास मागील महिन्यात केवळ अमेरिकेने मान्यता दिली होती. अमेरिकेव्यतिरिक्त, Pfizer लस मध्य पूर्व आणि युरोप देशांमध्येही आणली जात आहेत.

डब्ल्यूएचओच्या एका अधिका-याने सांगितले की, कोविड -१९ लसीला जागतिक पातळीवर पोहोचता यावे यासाठी ही एक अतिशय सकारात्मक पायरी आहे. तसेच ते म्हणाले की, जगातील सर्व लोकांना ही लस लवकरात लवकर मिळणे महत्वाचे आहे. डब्ल्यूएचओने आपल्या एक्सपर्ट टीमकडून डेटा प्राप्त केल्यानंतर या लसीला मान्यता दिली आहे. तज्ञांनी असे म्हटले आहे की, ही लस सुरक्षिततेच्या सर्व बाबींवर योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे.

अमेरिकेत लस दिल्या जात आहेत
आतापर्यंत अमेरिकेत Pfizer कंपनीची लस दोन लाखाहून अधिक लोकांना लस देण्यात आली आहे. डिसेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात या लसीकरण कार्यक्रमास प्रारंभ झाला. मात्र, अमेरिकेत एफडीए त्या 5 प्रकरणांचा शोध घेत आहे ज्यामध्ये लोकांनी लस घेतल्यानंतर एलर्जीची तक्रार केली होती. यामुळे, अमेरिकन सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने असा इशारा दिला आहे की, कोरोना व्हायरस लसीमुळे ज्यांच्यामध्ये गंभीर एलर्जीची लक्षणे दिसून आलेली आहेत त्यांना लसीचा दुसरा डोस देऊ नये.

https://t.co/gamd6ToqVN?amp=1

आतापर्यंत 8 देशांमध्ये मान्यता
Pfizer लसीच्या तातडीच्या वापरासाठी 8 देशांनी मंजूरी दिलेली आहे. ब्रिटनशिवाय इस्त्राईलने नुकतेच कॅनडा, बहरीन, अमेरिका, मेक्सिको, मलेशिया आणि स्वित्झर्लंडनेही मान्यता दिली आहे. इस्त्राईल दररोज 60 हजार लोकांना लस देण्याचा प्रयत्न करतो आहे.

https://t.co/G1Qkz16mYe?amp=1

Pfizer लस आव्हान
जगात कोरोना विषाणूचा सर्वाधिक संसर्ग अमेरिकेत झालेला आहे. Pfizer च्या लसीमध्ये अडचण अशी आहे की, ती -70 डिग्री सेल्सिअस तापमानात स्टोअर करणे अनिवार्य आहे, तर मोडर्नाच्या लसीचे तापमान -20 डिग्री सेल्सियस असणे आवश्यक आहे.

https://t.co/opIIisdlJ8?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.