मुंबई | महाराष्ट्र रूग्ण संख्येचा वाढीचा वेग हा चिंताजनक आहे. वाढता करोना यावर मात करण्यासाठी राज्य सरकारने राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र या कडक निर्बंधांच्या विरोधात राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी व्यापार्यांकडून विरोध व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने लागू केलेल्या निर्बंध यामध्ये काही शिथिलता येणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबत भाष्य केले आहे.
मुंबई येथे घेतल्या गेलेल्या पत्रकार परिषदेत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हंटल आहे की, दुकानं बंद आहेत हे मान्य आहे. पण जीव वाचवण्याचा प्राधान्य देण्यात येत आहे. आत्ता लागू केलेल्या निर्बंध यामध्ये काही प्रमाणात शिथिलता येईल का याबाबत मंत्रिमंडळाचा विचार करू असे टोपे यांनी स्पष्ट केले आहे.
निर्बंध कडक केलेले आहेत लॉक डाऊन नाही
राज्यात लागू केलेल्या निर्बंध बद्दल बोलताना टोपे म्हणाले राज्यामध्ये कडक निर्बंध लागू केलेले आहेत लोक डाऊन केलेले नाही. तसेच या कठीण काळात कोणीही राजकारण करू नये भाजपनंही सहकार्य करावे अशी विनंती टोपे यांनी केली आहे.
रेमडिसिव्हर बाबत सूचना
रिमडीसीव्हर 1100 ते 1400 रुपयांपर्यंतच्या किमतीतच विकावे.केवळ बिल वाढावे म्हणून रेमडिसिवर वापरलं जात आहे. त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.खाजगी डॉक्टर यांनी रिमडीसीव्हरचा वापर केवळ निर्देशांक पुरता करावा.
राजेश टोपे यांचे ‘या’ ठळक मुद्द्यांवर भाष्य
– करोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार.
– इतर राज्यातून ऑक्सिजनची मागणी करण्यात आली आहे.
– महाराष्ट्रात बाराशे मेट्रिक टन ऑक्सिजन तयार होतो. तो सर्व आता रुग्णांसाठी ठेवला आहे.
– 20 ते 40 या गटाला लस द्या अशी मागणी केंद्र सरकारला केली आहे.
– आजाराचा स्ट्रेन बदलला आहे का अशी शंका आहे याबाबत केंद्राला कळवलं आहे ते नमुने दिले आहेत.
– जर 40 लाख लस उपलब्ध झाल्या नाहीत तर तीन दिवसात लसीकरण बंद होईल.
असे सर्व महत्वाचे मुद्दे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत मांडले आहेत.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group