व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत येणार? अजितदादांनी स्पष्टच सांगितलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना ठाकरे गट आणि आम्ही निवडणूक जाहीर झाली एकत्र येऊ असं म्हटलं होत. परंतु उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे घटक पक्ष असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची भूमिकाही यामध्ये महत्त्वाची आहे. त्यामुळे जर प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे एकत्र असल्यास महाविकास आघाडीचे काय होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी या नव्या आघाडीला ग्रीन सिंग्नल दिला आहे.

अजित पवार म्हणाले, आम्ही वंचित आघाडी सोबत चर्चा करण्यास तयार आहे. समविचारी लोक एकत्र येऊन समोरच्या सत्ताधारी पक्षाचा पराभव करण्यासाठी मतविभागणी होत नसेल तर आमची तयारी आहे. पण तयारी एका बाजूने असून चालत नाही. तयारी दोन्ही बाजूंनी असावी लागते असेही त्यांनी म्हंटल. त्यामुळे प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत सामील होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, २० नोव्हेंबरला मुंबईतील शिवाजी मंदीरमध्ये उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर प्रबोधनकार.डॉट. कॉम या वेबसाईटच्या रिलाँचिंगच्या निमित्तानं एकत्र आले. या कार्यक्रमानंतर प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना ठाकरे गट आणि आम्ही निवडणूक जाहीर झाली एकत्र येऊ असं म्हटलं होत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनीही देशाचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी जे जे सोबत येतील त्यांच्यासोबत आम्ही जाणार, असं म्हणतं आगामी काळात वंचित बहुजन आघाडीसोबत युतीचे संकेत दिले होते.